कोरोना प्रादुर्भावावर यशस्वीपणे मात करण्यासाठी म्हसळा सभापती छाया म्हात्रे यांनी घेतली गाव भेटी



म्हसळा -प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आलेल्या दुसऱ्या भयंकर लाटेत ग्रामीण भागातील लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने त्यांना प्रबोधन करण्यासाठी म्हसळा पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे यांनी त्यांचे मेंदडी पंचायत समितीच्या गणातील रोहिणी,तुरूंबाडी,रेवली गावांना  दि.12 मे रोजी भेटी दिल्या.राज्यात बरोबर तालुक्यातील गावांत वाढते बाधीत रुग्ण त्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याबाबत सर्व ग्रामस्थांचे प्रबोधन व मार्गदर्शन सभापती छायाताई म्हात्रे यांनी केले तसेच कोरोनाच्या लसीबाबत जनजागृती केली.प्रत्येक ग्रामस्थांनी लसीकरण करुन घेतले पाहिजे असे आवाहन केले.गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळात झालेल्या शालेय इमारतची झालेल्या नुकसानीसाठी रायगड जिल्हा परिषदे मार्फत आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजुर  निधीतून दुरुस्तीची कामे चालू असलेल्या शाळांची या वेळी सभापती म्हात्रे यांनी पाहणी केली आणि त्या आवश्यक सूचना केल्या.यावेळी त्यांचे समावेत केंद्रप्रमुख किशोर मोहिते,शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा