खंडित झालेला वीजपुरवठा युद्धपातळीवर काम करून तात्काळ सुरू करावा-पालकमंत्री कु.आदिती तटकरे



"ताऊक्ते" चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील 661 गावांवर पडला जवळपास 1 लक्ष 6 हजार नागरिक वीजपुरवठयापासून वंचित झाले आहेत.
    यासंदर्भात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे घेतली.
    यावेळी आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, महावितरणचे भांडुप विभागाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे हे उपस्थित होते.
    यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी निर्देश दिले की, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन वीजपुरवठा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करावी. युद्धपातळीवर काम सुरू करून नागरिकांसाठी  वीजपुरवठा पूर्ववत सुरू होईल, यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा