बाबू शिर्के : म्हसळा
देशात प्रचंड इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर शंभरीवर गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यातच केंद्र सरकारने खतांचे दर वाढवत शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. या विरोधात म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि. 24 मे) दिघी नाका ते तहसील कार्यालय पर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. त्यांनतर तहसीलदार शरद गोसावी यांना निवेदन देण्यात आले.अगोदरच इंधनाची भरमसाठ दरवाढ करण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या ओझ्याखाली सामान्य माणूस भरडला जात असताना खतांची दरवाढ झाल्याने महागाईत आणखी भर पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोदी व केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे तहसीलदार कार्यालयाचा परिसर दणाणला होता. गुजरात राज्याला वादळ नंतर 1000 कोटींची मदत जाहीर केली पण महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.त्यामुळे आम्ही केंद सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत.तसेच भाववाढ कमी न झाल्यास जन आंदोलन करणार असल्याचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी यावेळी सांगितले. मोर्चा प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सभापती बबन मनवे, सभापती छाया म्हात्रे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर, उपसभापती संदीप चाचले, म्हसळा तालुका महिला अध्यक्ष रेश्मा काणसे, शहराध्यक्ष शगुप्ता जहांगीर, शाहिद उकये, वरवटने गण अध्यक्ष सतीश शिगवण,किरण पालांडे, गजानन पाखड, मंगेश म्हशीलकर, सरोज म्हशीलकर, संजय कर्णिक, चंद्रकांत कापरे, रमेश खोत, नाना सावंत आणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment