तळा-किशोर पितळे
तळा तालुक्यातील कर्नाळा येथील ६वर्षाचा कु.निलेश महादेव शिगवण रा.कर्नाळा ता.१५ मे २१रोजी दुपारी११.ते १ वाजण्याच्यादरम्यान बोरघर हद्दीतील नावरी नावाच्या जंगला मधूनमधल्या वाटेने तळा ते कर्नाळा गावाकडे जात असता अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.पोलीससुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सोबत मुलाची आई व भाऊ होते. वाटेतआई नैसर्गिक विधीसाठी बाजूला गेली असता ही दोन मुले तिथे होती त्यानंतर कु. निलेश दिसून न आल्याने आई व दुसऱ्या मुलाने शोधाशोध केली. बराच वेळशोधूनही न सापडल्याने गावात गेल्यावर ग्रामस्थांना सांगीतल्यावर गाव परिसरात नातेवाईक, व संपूर्ण नदी, विहीरी शोधून काढल्याअसता न मिळाल्याने तळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून न पोलीस पथक सामाजिक कार्यकर्ते शोध घेत आहेत सदर मुलगा अचानक गायब झाल्याने भिती व्यक्त केली जात आहे किंवा हिंस्रश्वापदापासून काही ईजातर केली नसेल नाअशी शंका निर्माण झालीआहे.यामुलांचे वडील विकलांग असून आईचे मानसिक स्वास्थ्य बरे नसून या चुणचुणीत हुशार मुलासाठीग्रामस्थ मंडळ अहोरात्र मेहनत घेऊन तपास करीत आहेत.यासाठी खाजगी ड्रोन कँमेरा मागविण्यात आला असून युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. सदर मुुलगा आढळून आल्यास फोन नं ०२१४०-२६९०३३वर संपर्क साधावा माहिती अशी ग्रामस्थांनी दिली. अज्ञात इसमा विरुद्ध भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांचे मार्गदर्शना खाली पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक शिवराज खराडे करीत आहेत.
Post a Comment