कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रांत अधिकारी प्रशाली दिघावकर यांनी तळा शहरातील परिस्थितीचा घेतला आढावा.



तळा (किशोर पितळे)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रांत प्रशाली दिघावकर यांनी तळा शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तळा नगरपंचायत कार्यालयात सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची बैठक घेण्यात आली. ज्यामध्येकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आली.तसेच तळा बाजार पेठेतील व्यापारी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऍपे, रिक्षा, मिनिडोअर चालक मालक यांच्या प्रमुखांचीदेखील बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये दुकानदारांनी स्वतः मास्क वापरणे, सॅनिटाइझर वापरणे, सामाजिक अंतर राखणे, आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घेणे, व्यापाऱ्यांनी आपले दुकान सॅनिटाईज करणे, ऍपे रिक्षा मध्ये प्रवाशांना सामाजिक अंतराचे पालन करण्यास सांगणे, घरातील जेष्ठ व्यक्तींना बाहेर फिरू न देणे अशाअनेक सूचना प्रांत अधिकारी प्रशाली दिघावकर यांनी उपस्थित व्यापारी व ऍपे रिक्षा चालक प्रमुखांना दिल्या.याप्रसंगी तहसीलदार ए.एम.कनशेट्टी, पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे, मुख्याधिकारी माधुरी मडके, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम कजबजे यांसह सर्व नगरसेवक व व्यापारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा