वाढता ताण लक्षात घेऊन रत्नागिरीत कराेना टेस्टिंगसाठी दुसरी लॅब उभारणार - नामदार उदय सामंत




टीम म्हसळा लाईव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात कराेना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या कोरोना तपासणी सुरू केल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यात कोरोना टेस्ट केलेल्यांचे अहवाल येण्यास तीन ते चार दिवस उशीर होत आहेत  याबाबत आपण लक्ष घातले असून  लवकरच जिल्ह्यात आरटी पीसीआर टेस्टींगसाठी दुसरी लॅब निर्माण केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली  रत्नागिरीत सध्या शासकीय रूग्णालयात आरटी पीसीआर टेस्टिंग करणारी एक लॅब असून  प्रशासनाने टेस्टिंग करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे या लॅबवर मोठा ताण पडला आहे त्यामुळे आरटी पीसीआर   रिपोर्ट मिळण्यास  उशीर होत आहे  यासाठी शासकीय रुग्णालयात  सोळा लाख रुपये खर्च करून नवीन टेस्टिंग लॅबची उभारणी केली जाणार आहे यामुळे सध्या एका लॅबवर पडत असलेला ताण कमी होऊन दोन्ही लॅबमार्फत तपासणी अहवाल येणार असल्याने लोकांना चोवीस तासांत रिपोर्ट मिळू शकणार आहेत असेही सामंत यांनी सांगितले  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा