म्हसळा तालुक्यात लसीकरण मोहिमेच्या दुसर्या टप्प्यात (Corona Vaccination Drive) मेंदडी प्रा.आ.केंद्राचे काम कौतुकाचे
संजय खांबेटे : म्हसळा
देशासह राज्यातील सर्व जिल्ह्याचे तालुक्यांतून
लसीकरण मोहिमेच्या दुसर्या टप्प्यात (Corona Vaccination Drive) 60 वर्षांवरील वयोवृद्ध आणि 45 ते 59 वर्षांच्या दरम्यान ज्यांना गंभीर आजार आहेत, त्यांना कोविड लस दिली जात आहे. संपूर्ण म्हसळा तालुक्यासाठी केवळ मेंदडी प्रा.आ.केंद्राला लसीकरणासाठी मंजुरी आहे त्यांचे काम कौतुकाचे आहे असे म्हसळा पंचायत समितीचे ग.वि.अ.वाय.एन.प्रभे यानी आज मेंदडी लसीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट दिली त्यावेळी सांगितले.त्यांचे समवेत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनील गायकवाड, सांखीकी
विस्तार अधिकारी हीरालाल परकाळे, मेंदडी सरपंच श्रीमती राजश्री कांबळे, खरसई सरपंच निलेश मांदाडकर उपस्थित होते.
तालुक्यातील ६१ हजार ५४६ नागरिकाना म्हसळा शहरातील ग्रामिण रुग्णालय म्हसळा, आणि मेंदडी, म्हसळा आणि खामगाव या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विषयक सेवा व सुविधा पुरविल्या जात असतानाही केवळ एकच मेंदडी प्रा.आ. केंद्राला कोरोना लसीकर णासाठी (Corona Vaccine) मंजुरी मिळाली आहे.रविवार दिनांक ७मार्च २०२० रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र अलिबाग येथें म्हसळा तालुका मधून प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडी येथील आरोग्य सेविका दीपिका दिवेकर,आरोग्य सहायिका विमल पोटफोडे आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर गणेश दाताळ याना प्रशिक्षण देण्यात आले.कोविड लसीकरनाचे सर्व नियम आणि आटी पाळून आरोग्य सेविका
श्रीमती दीपिका दिवेकर यांनी पहिल्या दिवशी १० लाभार्थी आणि दुसऱ्या वेळी १७ व तीसऱ्या वेळी २० लाभार्थीना यशस्वीरित्या डोस दिला.
"सोमवार दि.८मार्च पासून केंद्र शासनाचे धोरणा नुसार १ दिवस आड लसीकरण सुरु आहे.सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशाकार्यकर्ती याचे मार्फत जनजागृती होत आहेलसीकरणाला गती येत आहे. कोव्हिड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. ज्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जाणार आहे".
डॉ नम्रता नागे ,वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र , म्हसळा
"४५ ते ६० वयोगटातील ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहेत त्यांना नोंदणीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज असेल.गंभीर आजारांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंड आणि फुप्फुसांशी संबंधित २० गंभीर आजारांचा (को-मॉर्बिडिटीज) समावेश आहे.६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी केवळ आधारकार्ड पुरेसे असणार आहे. - डॉ. गणेश कांबळे तालुका आरोग्य अधिकारी, म्हसळा.
Post a Comment