म्हसळा बाजारपेठेत काजूच्या बियांची आवक वाढली


म्हसळा (वार्ताहर)
म्हसळा बाजारपेठेत काजूच्या बीया आणी कच्चा करवंदाची आवक वाढली असून त्यामुळे आदिवासी बांधवाना  चांगला रोजगार मिळाला आहे.रोज 20 ते 25 आदिवासी महिला छोट्या टोपल्यात काजूगर बिया घेवून मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बसतात.120 ते 150 रुपये शेकडा याप्रमाणे काजूच्या बियांची विक्री  होते. दिवसाकाठी एक आदिवासी महिला या ओल्या काजूगर विक्रीतून सुमारे 800 ते 1000 रुपयांची विक्री करते. अशा प्रकारे 20 ते 25 या महिला दोन ते तीन महिन्यांसाठी ओल्या काजूगरातून चांगली आर्थिक कमाई होत असते.यावर्षी आदिवासी बांधवानी मोठया प्रमाणात काजूबिया उपलब्ध करून दिल्या आहेत.त्या बीया खरेदी साठी मोठया प्रमाणात ग्राहक गर्दी करताना दिसतात.  शाकाहारी व मांसाहारी जेवणामध्ये ओल्या काजूगराचा समावेश मोठ्या प्रमाणात करण्यावर खवय्यांचा भर असतो. रानमेवा शारीरिक धनसंपदेस बळ देणारा व बौद्धिक क्षमता वाढविणारा असल्याने ओल्या काजूगराचा छोटासा वाटा ग्राहकांकडून हमखास खरेदी केला जात आहे.या मुळे दोन ते तीन महीने का होईना आदिवासींना आर्थिक दिलासा मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा