म्हसळा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांची कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्षपदी नेमणूक



(म्हसळा प्रतिनिधी)
कोकण विभाग ग्रंथालय संघाचे रत्नागिरी येथे शनीवार दि.६ मार्च रोजी झालेल्या सभेत कोकण विभागासाठी ( पालघर, ठाणे, मुंबई शहर, बृहं मुंबई, रायगड, २त्नागिरी व सिंधुदुर्ग) मंगेश मसके (अध्यक्ष), आणि कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष पदी श्री.रामदास गायकवाड (कर्जत) प्रमुख कार्यवाह पदी श्री.प्रकाश पाटील( शहाबाज -आलिबाग आणि कोषाध्यक्षपदी श्री.संजय खांबेटे (म्हसळा) आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक पदी श्री.संजय भायदे(मुरुड -जंजिरा) यांची बिनविरोध निवड झाली. निवड झालेले सर्व पदाधिकारी गेले ३०ते ३५ वर्ष ग्रंथालय चळवळीत व ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यात सक्रीय आहेत. सदर निवडीबाबत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोदार्डे, चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक नागेश कुळकर्णी, श्रीकृष्ण उर्फ आप्पा बाळ व जिल्ह्यांतील चळवळीतील अनेक पदाधिकारी , राजकीय मंडळी व कार्यकर्तानी अभिनंदन केले.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा