वडगाव येथे वणवा लागून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान


वडगाव येथे वणवा लागून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान 

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पंचनामा करण्याचे दिले आदेश 

राम भोस्तेकर माणगाव

माणगाव तालुक्यातील मौजे वडगाव येथील रघुनाथ गावडे या शेतकऱ्याची आंबा लागवड केली होती. पण काल लागलेल्या वणव्यात त्याची आंबा लागवड सहित ठिबक सिंचन जळून त्याचे लाखोचे नुकसान झाले. सदर ची घटना शेतकर्याचे स्नेही मार्फत पालकमंत्री यांना कळताच अधिवेशनात असतांना देखील तहसीलदार यांना आदेश देउन तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.

   वडगांव येथील शेतकरी रघुनाथ गोविंद गावडे यांच्या शेतामध्ये काल (बुधवारी) रात्रीच्या सुमारास वणवा लागला. हा वणवा इतका भीषण होता की, या वणव्यामध्ये बोअरवेलचा पाँवर सप्लाय, आंब्याची २५ कलमे, तसेच दोन एकर जागेत घेतलेले तुरीचे पिक आणि तसेच ठिबक सींचन पाईप लाईन आदि जळून खाक झाले. 
या घटनेची माहिती मिळताच तहसिलदार पियांका कांबळे -अहिरे यांनी मंडल अधिकारी श्री. पाटील आणि गोरेगांवचे तलाठी वैभव आंब्रे यांना  तातडीने घटनास्थळी  दाखल होवून, पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यांनतरश्री. आंब्रे यांनी नुकसानीचा पंचनामा केला.


कोकणातील शेतकऱ्यांचा वणवा रोखणे हा वर्षानुवर्ष चा प्रश्न पडलेला आहें. यामुळे अनेक शेतकर्याचे नुकसान होते. यासाठी शासनाने तालुका स्तरावर वणवा विरोधी पथक तयार करण्याचे आदेश वन विभागला दिले आहेत. या मुळे तालुक्यात वणवा विरोधी पथक असायला हवे होते. पण माणगाव तालुक्यात हे पथक करण्याकरीता वन अधिकारीची निष्क्रियता दिसून येत आहें. यामुळेचा माणगाव तालुक्यात रोजच्या रोज वणवे लागलेले पहावयास मिळत आहें.
       

 कोकणात वणवा मुळे अनेक शेतकऱ्याचे  लाखो रूपयाचे होत आहें. तरी शासनाने या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई द्यायला हवे आहें. आणि हि नुकसान भरपाई साठी कोणतीही शासनाने तरतूद केली नाही आहें. तरी वणवा लागून शेतकर्याना नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसान   भरपाई मिळवी या साठी  चालू असलेल्या अधिवेशनात विशेष बाब घेऊन शासन निर्णय व्हावा अशी मागणी होत आहें

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा