किरण शिंदे / लोणेरे
सोमवार पासून गोरेगांवच्या प्रथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी विनोद गोरेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी सौ.स्वप्नाली पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना (कोविड १९ ) विरुद्ध लढण्यासाठी लसीकरणास सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी सकाळच्या सुमारास लसीकरण कक्षाचे उद्घाटन माणगांव पंचायत समितीचे उपसभापती महेंद्र तेटगुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या रा जि प सदस्या सौ. अमृताताई हरवंडकर, मा.सभापती सौ.अरूणाभाभी शेठ, मा.सभापती राजेश पानावकर, उपसरपंच विनोद बागडे, ग्रां.पं.सदस्य समिर खुळे, सुरेश पवार, मा ग्रां पं.सदस्य सुरेश पालकर ग्रां वि.अ.पोळेकर, लेखनिक सुभाष वाघे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः आरोग्य खात्यातील सेवानिवृत्त सुपरवायझर चंद्रकांत अंबुर्ले व दै.रायगड टाइम्सचे पत्रकार प्रमोद मोहिरे यांनी लस घेऊन लसीकरणास प्रारंभ केला. लसीकरणासाठी सकाळी ११ वाजल्या पासून सुरुवात होताच गोरेगांव परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचा-यांसह आशा, अंगणवाडी सेविका यांनी शिस्तबध्द पध्दतीत सुविधा निर्माण करून लसीकरणासाठी येणा- या नागरिकांची सोय केल्याचे पाहायला मिळाले.
गोरेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणा- या सर्व गावांतील ६० वर्षावरील नागरिकांना प्रथम लस देण्यात येणार असून नागरिकांनी लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. येताना आधारकार्ड, वोटिंग कार्डसह अन्य कोणतेही ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार, शुक्रवारी असे तीन दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आरोग्य अधिकारी अथवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment