"अशी पाखरे येती आणीक स्मृती ठेऊनी जाती" : कॉग्रेसी,गांधीवादी,विचारसर्णीचे स्व.नारायणराव मेकडे काळाच्या पडद्याआड.


"अशी पाखरे येती आणीक स्मृती ठेऊनी जाती"

*कॉग्रेसी,गांधीवादी,विचारसर्णीचे स्व.नारायणराव मेकडे काळाच्या पडद्याआड.

तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्यातील जेष्ट पत्रकार नारायणराव मेकडे यांचे १२ फेब्रुवारी रोजी सायं ७.३०वाजता डोंबिवली येथे निधन झाले मृत्यू समयी ९४ वर्षाचे होते. दोन वर्ष छोट्या मोठ्या आजाराने त्रस्त झाले होते.गांधीवादी विचार सारणीचे चळवळीचे खरे पाईक होते.जवळपास पन्नास वर्ष पत्रकारिता व एकमेव पेपर विक्रीचा व्यवसाय व बाँन्ड विक्री व रायटर म्हणून प्रसिद्ध होते. रायगड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य होते.काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते बँ.ए आर अंतुले यांचे समर्थक होते.पक्ष बदलू धोरण कधीच केले नाही.राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा दलित मित्र पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले होते. कधीही पुरस्कार मिळावा म्हणून हव्यास नव्हता अशा निर्गवी व्यक्तीमत्व,खादीचा पेहराव असणारे नारायणराव मेकडे.संयमी राजकारणी, समाजकारण अधिक करीत असत.शेकापचे स्व.ना गो पाटील प्रभाकर पाटील दता पाटील याचे दत्ताशेट खानविलकर याचाजिव्हाळ्याचासंबध होताआजपर्यंत जयंत पाटील पंडीत शेट पाटील ओसरीवर येऊन भेट घेत असत जिल्हा परिषदेत कामा निमित्ताने गेले तरी त्याचा आदर करीत होते तळा ग्रुप ग्रामपंचायत चे

उप सरपंच म्हणून काही काळ कामपाहीले तळेविभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे काही काळ उपाध्यक्ष त्यानंतर विद्यमान विश्वस्त होते.नामदेव शिंपी समाज तळाचे विश्वस्त होते.तळा प्रेस क्लबचे जेष्ठ सल्लागार होते.स्वातंत्र्यपुर्व काळापासून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेऊन चौका चौकात जनजागृती पोवाडे राष्ट्र भक्तीपर कामे केली. बाजारपेठेतील चौकात १५आँगस्ट१९४७ सालीरात्री१२वा.स्वातंत्र्यसैनिकस्व.पुष्पलताआंबेतकर, प्रभाकर देशमुख, दतात्रेय.मालू. तळेगांवकर, वामनराव वेदक सह नारायणराव मेकडे अशाथोर विभूतीनी ध्वजारोहण केले.आज देखील ध्वज स्तंभ ओळख आहे.नारायणराव यांनी वाचन आणी लिखाण कधीच सोडले नाही.वाचाल तर वाचाल अशीशिकवण त्याकाळी तरूणांना दिली. पेपर विक्री व्यवसायात असताना अनेकांना वाचनाची गोडी लावली. नवशक्ती,लोकसत्ता,मराठा, तरूण भारत, नवाकाळ, कृषिवल, इकोनाँमिक टाईम्स, टाईम्स आँफ इंडीया, फ्री प्रेस जनरल असे एक ना अनेक वृतपत्र मिळत असत.काही जण तेथेच बसून पेपर चाळीत असताना कधीच हाडीस हुडीस केले नाही त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी लागली.मात्र त्या आयुधाचा ना त्यांनी कधी बडेजाव केला,ना कधीदुरुपयोग.केला .उलट आलेल्या सर्व सामान्य व्यक्तीचा चहापाणी देेऊन आदरसत्कारच करीत होते.याआपले स्वागतआहे. अशीआदराने बोलत होते.अशी *जुनी माणसे* काही *ओळखीच्या खुणा, दुवे* पत्रकारिकतेचे कुशल मार्गदर्शक,कायमचे *पुसले गेले,*.पण काय करणार? *ईश्वरेच्छा.बली असे* त्याला तसाही ईलाज नसतोच.* -आता मात्र त्यांची ओसरी रिकामी झालेली पाहायला मिळणार आहे. नारायणराव मेकडे आज अनंतात विलीन झाले.तळा तालुक्याची मोठी पोकळी निर्माण झाली असुन कधीही पोकळी भरुननिघणारनाही.अशा जेष्ठ पत्रकाराला(वार्ताहरला)मुकला आहे.या जेष्ठ पत्रकाराबद्दल किती लिखाण करावे तेवढे थोडेच आहे.फक्त "अशी पाखरे येती आणीक स्मृती ठेऊनी जाती."असे म्हणणे योग्य ठरेल.मृृृताम्यास चिरशांती लाभो.हि ईश्वर चरणी प्रार्थना!!

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा