महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग माणगाव शाखेचा शिक्षक स्नेहमेळावा व महिला चा हळदी कुंकू समारंभ संपन्न
राष्ट्रहित, शिक्षणहित, विद्यार्थीहित,शिक्षकहित
माणगाव :- राम भोस्तेकर दि. 13 फेब्रुवारी 2019 रोजी कुणबी भवन माणगाव येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग माणगाव शाखेचा शिक्षक स्नेहमेळावा व महिलांचा हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्स्फूर्तपणे शिक्षक बंधू-भगिनींच्या सहभागात संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाड- माणगाव-पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय भरतशेठ गोगावले, माणगाव पंचायत समितीच्या सभापती अलका जाधव, उपसभाती महेंद्र तेटगुरे, मा. सभापती राजेश पानवकर, सुजित शिंदे माणगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा संगीता बक्कम,पत्रकार सायली दळवी ,डॉक्टर तुषार शेठ, गटशिक्षणाधिकारी डॉ. सुनिता चांदोरकर ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संजय निजापकर ,महाड-पोलादपूर -माणगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह विजय पवार,माणगांव तालुका शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष सुहास चांदोरकर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, जगदीश म्हात्रे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष भोपी , जयदास घरात ,उमेश विचारे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष कळंबे, नागोठकर, खाडे ,महाड तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष मांढरे बुवा, संजय कोंडविलकर , सचिन खोपडे , बालाजी गुबनरे , समीर होडबे ,बाळासाहेब बरगजे, रवि पाटील ,शिक्षक परिषदेचे नितीन गर्जे, अशोक सहाणे, रोहा शिक्षक परिषदेचे उमेश महाडेश्वर अनिल नागरगोजे ,रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अलिबाग चे चेअरमन माननीय सुशील वाघमारे ,कोकण विभागीय प्रतिनिधी संदीप शिंदे ,राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे ,केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जामकर ,पत्रकार कमलाकर होवाळ , सलीम शेख , संतोष सुतार , प्रमोद किरण जाधव,सुनंदा जाधव,रायगड जिल्हा महीला आघाडी प्रमुख दिप्तीताई गावंड ,स्मिता नवघरे, मिंडे मॅडम हे प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली यावेळी पहेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी संदीप साळवी सरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम असे स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तळा येथील प्राथमिक शिक्षक सचिन कांबळे सर यांनी छत्रपती शिवरायांवर अतिशय सुंदर असा पोवाडा गीत गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष गणेश निजापकर यांनी केले.संघटनेच्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी उपस्थित शिक्षक बंधू-भगिनींसमोर मांडला. त्यानंतर माणगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. सुनीता चांदोरकर यांनी करोना काळात आणि निसर्ग चक्रीवादळात शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर यांनी आपल्या मनोगतात शिक्षक परिषदेने केलेले काम व शिक्षक परिषद करत असलेले समाजोपयोगी काम, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न याबाबत मार्गदर्शन केले. माणगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती महेंद्र तेटगुरे साहेब यांनी शिक्षकाच्या कामाचे कौतुक आपल्या मनोगत व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शक भाषणामध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांनी शिक्षकांच्या अडी-अडचणी समजून घेवुन जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ,शाळा-शिक्षक विद्यार्थ्यांच्या बाबतीतील ते सर्व लवकरच शासन पातळीवर सोडण्यात येतील. मंत्रालय पातळीवर शिक्षक परिषदेसाठी मी व माझे सहकारी सदैव उपलब्ध असतील, असे या वेळेस सांगितले. शिक्षकांच्या कामाचे कौतुक उपस्थित सर्व मान्यवरांनी केले. "प्लास्टिक हटाव"चा संदेश देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे अनावरण करुन, वाटप करण्यात आले. यावेळी माणगाव पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी डॉ सुनिता चांदोरकर मॅडम यांचा पी.एच्.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. माणगाव तालुक्यातील सेवानिवृत्त झालेल्या केंद्रप्रमुख, पदोन्नती मुख्याध्यापक, उपशिक्षक यांचा सेवापुर्ती सत्कार शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आला. तसेच ज्या ज्या शिक्षकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात गुणगौरव संपन्न केला आहे, त्या सर्व शिक्षकांचा शिक्षक परिषदेच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच 'राष्ट्रहित, शिक्षणहित, विद्यार्थीहित, शिक्षकहित' या उक्तीप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात विविध यश-कीर्ती संपादन केली आहे, अशा विद्यार्थ्यांचाही शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजयजी निजापकर यांच्या नेतृत्वात माणगाव तालुका शिक्षक परिषद अध्यक्ष गणेश निजापकर ,कोकण विभाग प्रतिनिधी संदीपजी शिंदे ,रायगड जिल्हा कार्यालय मंत्री जितेंद्र बोडके ,राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे ,माणगाव तालुका कार्यवाह सुजित भोजने ,माणगाव तालुका कार्याध्यक्ष मारुती नाईकडे , कोषाध्यक्ष सतीश ढेपे , कार्यालयीनमंत्री रत्नदीप चाफे, संघटक परेश अंधेरे ,मुकेश भोस्तेकर, अशोक जाधव संचालक अलिबाग पतपेढी , ज्येष्ठ मार्गदर्शक शंकर शिंदे,राजेश पाबरेकर, जिल्ह्याचे खंबीर व युवा शिक्षक नेतृत्व सुधाकर करकरे सर , संजय पाटोळे, संदीप साळवी ,प्रकाश मोरे , सुहास चांदोरकर अरविंद मोरे , स्मिता पाबरेकर , साधना करकरे जंगम ,श्रीम केशर सानप-पालवे,श्रीम गीतांजली शेळके सायराबानू चौगुले मॅडम व सर्व महिला सहकारी भगिनी, यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमास माणगाव तालुक्यातील पाचशे शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. तर जिल्हाभरातील सर्व संघटनांचे सर्व जिल्हाध्यक्ष व मुख्य नेते तसेच विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी आवर्जून पूर्णवेळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटोळे, सुर्यभान शिरसाट यांनी केले तर आभार सुधाकर करकरे यांनी मानले
साद तुमची ....साथ आमची.... महाराष्ट्रातील शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव हक्काची विश्वासाची संघटना म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग. जय शिक्षक परिषद
Post a Comment