जि.प.अंतर्गत ३० वर्ष रोजंदारीवरील कर्मचा- यांना कायम करा- विनायक उंडरे



देवळी ग्रामीण पाणीपुरवठा योजना च्या कंत्राटी रोजंदारांचा पालकमंत्री आदिती तटकरे यांना कायमस्वरूपी करण्यासाठी निवेदन

किरण शिंदे / लोणेरे

माणगाव१५ फेब्रु. माणगांव तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रांमीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत गेली ३० वर्षे रोजंदारीवर काम करणा- यां कर्मचा- यांना कायम करण्यासाठी नुकतेच कर्मचा- यांनी रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची भेट घेऊन नुकतेच निवेदन सादर केले आहे.
   राजिपच्या देवळी,लोणेरे ग्रांमीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत विवेकानंद काळे,भिकू डवले, रमेश शिर्के,महादेव ढवळ, सुनिल गोरेगांवकर,सुरेश शिंदे, महादेव ढेपे,अनंत सुतार,साधु पालकर,रमण कासरेकर, परशुराम आंबोणकर,श्रीधर सुर्वे,गणपत शिंदे,बाळाराम शिंदे, आदींसह अन्य कर्मचारी गेली ३० वर्षे  इमाने इतबारे आपली रोजंदारीवर सेवा बजावत आहेत.३० वर्षे सेवा बजावतानां या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वप्न पाहिले होते की आज ना उद्या आपल्याला या सेवेत कायम स्वरुपी रायगड जिल्हा परिषद सामावून घेईल.मात्र अध्याप त्यांचे स्वप्न स्वप्न राहिले असून अध्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही.कोरोनाच्या काळात कर्मचा- यांचे हाल झालेच त्यानंतर ही वाढत्या महागाईच्या दृष्टीने खूप कमी रोजंदारी मिळत असल्याने कुंटुबाचे पालन पोषण करतानां तारेवरची कसरत करावी लागत आहे.या उद्भवलेल्या परिस्थिती मुळे अखेर सर्व कर्मचा- यांनी रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची सुभाष केकाणे, विनायक उंडरे व अन्य पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.

देवळी ग्रामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या योजणे मध्ये कितेक वर्ष रोजंदारीवर काम करतं आहोत महागाई च्या दृष्टीने सध्या खुप कमी रोजंदारी मिळत आहे त्यामध्ये कुटुंब चालविले तारेवरची कसरत करावी लागते आहे त्यामुळे आम्हाला कायम स्वरुपी हाजर करून घेऊन न्याय मिळावा.
- रमण कासरेकर, रोजंदारी कामगार

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा