राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी पनवेलच्या प्रतीक्षा शेरकर हिची निवड




म्हसळा प्रतिनिधी

सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने ४ मार्च ते ८ मार्च २०२१ रोजी श्रीनगर येथे होणाऱ्या  वरिष्ठ गट राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून पनवेलची सुकन्या प्रतीक्षा शेरकर हिची निवड करण्यात आली आहे.नुकत्याच जळगाव येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून प्रतीक्षा हिची निवड झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षा तथा पनवेल मनपा नगरसेविका सिताताई पाटील,सचिव स्वप्नील वारंगे,खजिनदार हेमंत पयेर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी प्रतीक्षा हिचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा