तळा (किशोर पितळे)तळा नगरपंचायतीच्या निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पुर्व तयारीला
लागली असून भाजपचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. मनोज पाथरे यांनी महाड चेआमदार भरतशेट गोगावले साहेब जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके, विभाग प्रमुख दिपक चिंचाळकर,लिलाधर खातु ,नमित पांढरकामे, गुरूदास तळकर व तमाम शिवसैनिक यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करून भाजपला खिंडार पाडले.त्यामुळे भाजप पक्षाचा अनुभवी कार्यकर्ता सेनेच्या गळाला लागला आहे.तालुक्यात भाजप पक्षाची मुहूर्तमेढ रोवली होती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे संपर्क प्रमुख कृष्णा कोबनाक यांनी जबाबदारी दिली होती.पाच वर्षापूर्वी पक्षाचे संघटना वाढवली पक्ष मजबूत केला मागील विधानसभा निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतला परंतु पक्ष श्रेष्ठींनीस्थानिक पातळीवर कार्यकर्यांना विचारात न घेता परस्पर निर्णय घेऊन पक्ष नेतृत्व बदल केला. त्यांनतर देखील पुन्हा माजी अध्यक्षाला विचारात न घेता विविध पदाधिकारी बदल केले.आज देखील विद्यमान अध्यक्ष प्रत्येक सभेला कार्यकर्ते बैठकीला डावलले गेले आहे.त्यामुळे पक्षात कोंडमारा होत होता.राज्यात एक हाती सत्ता असतानापाच ते सहा विकास कामाची मागणी केलेली असताना एकही काम टाकू शकले नाहीत. सदर कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कामे करण्याची आश्वासन दीले.फक्त वाटाण्याच्या अक्षदा शीवाय काहीच केले नाही.शिवसेनेचा विकास कामाचा झंझावात व तळा शहरासाठी नियोजित पाणी पुरवठा योजना महत्त्वाच्या विकासावर प्रभावीत होऊन मा.आमदार भरतशेठ गोगावले व जिल्हाप्रमुख अनिल नवगणेयांच्या कार्यप्रणालीवर विश्वासठेवून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे असे प्रवेशानंतर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.दिवसेंदिवस शिवसेनापक्ष प्रवेशामुळे निश्चित ताकद वाढताना दिसून येत आहे. शिवसेना जोमात तर भाजप कोमात अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Post a Comment