श्रीवर्धन येथे किसान क्रेडिट शिबिर संपन्न




म्हसळा, तळा,पोलादपूर, महाड,माणगाव व  सुधागड मध्येही होणार शिबिरांचे आयोजन

टीम म्हसळा लाईव्ह

बँक ऑफ इंडिया, स्वदेस फाउंडेशन व तहसिलदार कार्यालय यांच्या वतीने किसान क्रेडिट शिबीर मंगळवार दि. 9 फेब्रुवारी रोजी श्रीवर्धन येथे संपन्न झाले.

श्रीवर्धन तालुक्यामधील शेती, पशूपालन व मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता त्यांच्या व्यवसायात प्रगती होण्यासाठी किसान क्रेडिट शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार बँक ऑफ इंडिया व स्वदेस फौंडेशन व  तहसिलदार  कार्यालय यांच्या वतीने  श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आले होते .

या शिबिरामध्ये 95 शेतकऱ्यांनी पशूपालन शेळी व मत्स्य व्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्ड चे अर्ज भरले.  या सर्वांना एका आठवड्यात बँक ऑफ इंडियाच्या वतीने किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान मत्स्यव्यवसाय किसान क्रेडिट कार्ड चे वाटप तहसिलदार सचिन गोसावी, अग्रणी जिल्हा प्रबंधक आनंद निंबेकर, स्वदेस फाउंडेशन महाव्यवस्थापक तुषार इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी स्वदेस फाउंडेशन व्यवस्थापक दीपक गिऱ्हे, बँक ऑफ इंडिया मॅनेजर धम्मपाल सोनसडे, विश्वास मूळगीर यांनी उपस्थित राहून किसान क्रेडिट कार्ड विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व अर्ज स्वीकारले.

म्हसळा व तळा येथे दि.10 फेब्रुवारी रोजी, पोलादपूर व महाड  येथे दि.11 फेब्रुवारी रोजी तर माणगाव व  सुधागड येथे दि.12 फेब्रुवारी रोजी  किसान क्रेडिट कार्ड शिबिराचे आयोजन बँक ऑफ इंडिया, स्वदेस फाउंडेशन व तहसिलदार कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा