कोमसाप युवाशक्तीचा ऑनलाईन भाषा दिन



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती या संस्थेने नवोदित कवींसोबत ऑनलाईन भाषा दिन साजरा करायचे ठरविले आहे.  लॉकडाऊनच्या परिस्थितीत कोमसाप युवाशक्तीनेही बालक, पालक, शिक्षक आणि युवावर्ग यांच्यासाठी साहित्यातील अनेक उत्तम कार्यक्रमांचे आयोजन केले होते. penned हा उपक्रम खास युवा लेखकांसाठी घेतला गेला होता. मराठी भाषा दिनानिमित्त penned या उपक्रमात आताच्या काळातील सकस काव्यलेखन करणार्‍या प्रथमेश पाठक, पवन नालट, अक्षय शिंपी यांच्या सोबत कविता, कवितासंग्रह याबाबत गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या तीन कवींसोबत प्रणय चव्हाण संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना कोमसाप केंद्रीय युवाशक्ती प्रमुख दीपा ठाणेकर यांची आहे . 
कोमसाप युवाशक्ती कॉलेजकट्टाच्या फेसबुक पेजवर  https://www.facebook.com/komsapyuvashakti/  हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम दर्शकांना पाहता येईल . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा