पालकमंत्री आदिती तटकरे यांचे शुभ हस्ते म्हसळा येथे " शिवराज अमृततुल्य" महिला बचत गटाचे एक कप चहा माणुसकीचा स्टॉलचे उदघाटन.
म्हसळा -वार्ताहर
तळा तालुक्यातील गणेश नगर येथील ग्राम कल्याण महिला बचत गटाने व्यवसाय करण्याचा स्तुत्य हेतुने म्हसळा येथे "शिवराज अमृततुल्य" एक कप चहा माणुसकीचा छोटेखाणी स्टॉलचे उदघाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांचे शुभ हस्ते संपन्न झाला.बचत गटाच्या प्रमुख रिशा दुर्गावले,निलिशा शिणगारे यांचे नेतृत्वाखाली स्थापित झालेल्या ग्राम कल्याण महिला बचत गटाच्या चहा स्टॉल व्यवसायात सुयश लाभण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मनोमन शुभेच्छा दिल्या.म्हसळा पाभरे जिप गटाच्या रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या धनश्री पाटील यांच्या शुभविवाह प्रसंगी त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी म्हसळा येथील नियोजित दौऱ्यात पालकमंत्री आदिती तटकरे यांचे समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिप सभापती बबन मनवे,जिप महिला बालकल्याण सभापती गीता जाधव,जिप सदस्य बबन चाचले,सभापती उज्वला सावंत,तळा तालुका सभापती श्रीमती कदम,म्हसळा उप सभापती मधुकर गायकर,माजी सभापती नाझीम हसवारे,माजी सभापती छाया म्हात्रे, पस सदस्य संदीप चाचले, प्रांत अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार शरद गोसावी, रमेश पोटले, सतीश शिगवण, किरण पालांडे,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जानसई रिव्हरफ्रंट व हींगुलडोह सुशोभीकरण प्रस्तावित प्रकल्पाची पहाणी केली.
Post a Comment