मुद्रा ग्रुप च्या तरुणांनी कष्टकऱ्यांना दिली मायेची ऊब




टीम म्हसळा लाईव्ह
आज रोजी मुद्रा ग्रुप नि संत रोहिदास जयंती निमित्त अकलूज तसेच यशवंत नगर या भागातील गोरगरिबांना ब्लॅंकेट्स तसेच वापरायचे कपडे वाटप करून एक नवीन आदर्श निर्माण केला संत रोहिदास यांचा आदर्श अंगी कृत करून हा उपक्रम एकदम योग्य प्रकारे पार पाडला गेला. गरजु लोकांन पर्यंत ब्लॅंकेट्स तसेच कपडे यांची पूर्तता करून गोरगरिबांना एक आनंदाचा क्षण अनुभवून दिला,ज्या लोकांना खरच ह्या साहित्यांची गरज भासते आशा लोकांन पर्यंत पोचून ही मदत करण्यात आली,व इथून पुढे ही करण्यात येणार आहे, या उपक्रमात मुद्रा ग्रुप च्या प्रतीक्षा नाईकनवरे,हिना शेख, तसेच मुद्रा ग्रुप चे सदस्य अभि लोखंडे, आदित्य कल्याणी,ऋषी जाधव,शहाजी थिटे,विनायक बाविस्कर,शंकर लोंढे, तेजस चेमटे,चेतन काटकर,सनी देशमुख,आकाश ठवरे,बाळकृष्ण चव्हाण सहभागी होते,हा उपक्रम प्रशांत जठार,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, या बद्दल मुद्रा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष यांनी सगळ्यांचे आभार मानले,व इथून पुढे सुद्धा असे उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा