माणगाव शहरातील सद्गुरू ऑईल व स्पेअर पार्ट च्या दुकानाला भीषण आग


 माणगाव शहरातील सद्गुरू ऑईल व स्पेअर पार्ट च्या दुकानाला भीषण आग प्रशासन व अग्निशमन दलाच्या मदतीनें आग आटोक्यात.

प्रतिनिधी-किरण शिंदे, माणगांव,

माणगाव शहरातील मुंबई गोवा महामार्ग नजीक असणाऱ्या स्वस्तिक कॉम्प्लेक्स मधील  कॉटन किंग शोरूम शेजारी असणाऱ्या गाड्याचे स्पेअर पार्ट व ऑइल विक्रेते सद्गुरू स्पेअर पार्ट दुकानाला २७ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० च्या सुमारास अचानक आग लागल्याने माणगांव शहरात एकच हळकल्लोळ माजला होता, मात्र माणगांव स्थानिक प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी योग्य वेळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे पुरेपूर प्रयत्न केले व आग आटोक्यात अनण्याकरिता महाड नगर परिषद व रोहा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दल व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आली मात्र मागील दोन दिवसात माणगाव तालुक्यात पहिल्यांदा मोरबा गावात सिलेंडर स्फोट व आग व आज रोजी माणगाव शहरात आग मात्र माणगाव तालुक्यात अग्निशमन दल अस्तिवात नाही माणगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन ५ वर्ष झाली शहराचा विकास नगर विकास खाते करत आहे , माणगांव हे जिल्ह्याचे मधयावर्ती ठिकाण आहे पण अग्निशामक दल नाही ही खंत आज प्रत्येक सुजाण माणगावकर नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. सुदैवाने तालुक्यातील घडलेल्या दोन्ही आपत्तीत जीवीत हानी टळली असली तरी अग्निशमन दल माणगाव ला पोहचण्यास १ तास वेळ लागतो या करिता माणगाव शहरास स्वतंत्र अग्निशमन दल द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत व अश्या आपत्तीतून प्रशासन व शासन यांनी माणगाव शहराकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी देखील होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा