राम भोस्तेकर माणगाव
माणगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण ओळखल्या जाणाऱ्या बामणोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवार दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी पोलीस बंदोबस्तात उत्साहात व शांततेत पार पडली.या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सरपंचपदी स्नेहा नथुराम खाडे तर उपसरपंचपदी मंगेश काळुराम पवार यांनी 17 फेब्रु राेजी ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेदरम्यान पदभार स्विकारला.
या मासिक सभेवेळी ग्रामसचिव (ग्रामसेविकी)भारती पाटील. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुशांत पडवऴ,स्वाती पाखुर्डे,उज्वला पाखुर्डे,रंजना काेळी,साक्षी दळवी,भारत पवार,सुवर्णा सकपाळ हे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित हाेते सर्व सदस्यांना गावातील रखडलेल्या विकासात्मक याेजना पुर्णत्वावस नेऊन ग्रामीण विकासास प्राेत्साहन देणार असल्याचे मत पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.
Post a Comment