तळगड किल्ला व परीसर पर्यटन स्थळ विकसित होण्यापासून अजूनही वंचित.




तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून शिवकालीन तळगड किल्ला बौद्धकालीन कुडालेणी अजूनही विकसित होण्यापासून वंचित आहे. पुरातन काळातील वास्तूंमधून तरूण पिढीला भूतकाळाच्या इतिहासाची पाने चाळून उकल होतो अशा वास्तू तळा तालुक्यात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांकडे १६६५मध्ये पुरंदरच्या तहा मुळे फक्त१२ गड राहीले त्यापैकीतळगड व घोसाळगड होते तळे कसब्यातून बाजारपेठेतून किल्ल्यावर घोड्याच्या पाठीवरून सामान अन्न धान्य नेल्याची नोंद कुलाबा गँझेट मध्ये आढळून येते. इ.स.१७३५मध्ये बाजीराव पेशवे हा गड गमावला आणी त्याचवर्षी सिध्दी जोहर मारला गेल्याने शिवाजी महाराजांनी तळगड परत मिळवला अशी साक्ष आजही मोठ्या दिमाखात देत आहे. असे असताना आजहि कुडा लेणी व तळगड दोन्ही वास्तू दुर्लक्षीत राहील्या आहेत. ३ फेब्रुवारी २००९ साली तत्कालीन ग्रामविकास व पर्यटनमंत्री मा.विजय सिंह मोहिते पाटील व पालक मंत्री ना.सुनिल तटकरे यांनी पंचायत समितीच्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे उद्घघाटन प्रसंगी कुडा लेणी तळगड पहाणी करून पर्यटनाच्या दृष्टीने पूर्ण विकसित केली जाईल व आर्थिक निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते. 

त्यांनतर पूरातन विभागाने पहाणी करून अहवाल आराखडा सादर केला गेला. परंतु आजही त्याला लाल फितीत लपेटला गेला आहे असे म्हणावे लागते. या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन व्हावेयासाठीतळे संस्कृती संवर्धन व पर्यटनसामाजिक संस्थेने तळगड येथे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व माहिती केंद्र उभारूनपरिसरातील इतरपर्यटनस्थळांचा विकास व्हावा.या पर्यटनातून राष्ट्रीय वारसा जतन व संवर्धन होऊन जनमाणसात ईतिहासा विषयी जनजागृती होईल तसेच स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होईल. पर्यटनाच्या माध्यमातून तळ्याचा विकास होईल या दृष्टीने पालकमंत्री तथा पर्यटन राज्य मंत्री मा.अदितीताई तटकरे यांना निवेदन सादर केले आहे.त्या निवेदनात ऐतिहासिक वस्तूचे संग्रहालय करण्यासाठी जागा उपलब्ध करून मिळावी. तळगडाची ढासळत चाललेली ऐतिहासिक बांधकाम संवर्धन करण्यात यावे तळगडावरीलकार्यरतकर्मचारीअधिकृत नेमणूक करण्यात यावी,वस्तू संग्रहालयासाठी निधी मिळावा,तळा तालुक्याला पर्यटन तालूका मान्यता मिळावी,गडावर विद्युत सुविधा,सुशोभीकरण,रोप वे ची सोय करावी,कुडा लेणीसाठी योग्य रस्ते,पाणी पुरवठा पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधा व निधी मिळावा तसेच ऐतिहासिक वस्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी जागा उपलब्ध करून मिळावी,राज्य स्तरीय संग्रालयासाठी जिल्हा ठिकाणी जागा कमतरतेमुळे होत नसल्याने तळगड परिसर कींवा शहरा परिसरात उपलब्ध करुन मिळाली अशा प्रमुख मागण्या निवेदनात केल्या आहेत.त्यापैकी तळगडा कडे जाणारा पुसाटीवाडी कडून रस्ता झाला आहे. मात्र अपेक्षित विकास न झाल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.पालकमंत्री महोदया यांनी जिल्हा विकास नियोजन आराखडा २०२१/२२साठी २४८कोटी रुपयांचा निधी मंजुरी देण्यात आली असून गड किल्ला संवर्धनासाठी ५%निधी राखून ठेवला आहे असे घोषित केले आहे. १२.४०कोटी पैकीकोणकोणत्या गडकिल्ले,पुरातन वास्तू जतन संवर्धन केल्याजाणारआहेत.याचा उल्लेख केला गेला नसल्याने ऐतिहासिक प्रेमी,पर्यटक नाराजी पसरली जात आहे.मुरुड जंजीरा,काशिद, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर हि पर्यटन स्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास होताना दिसत आहे.मात्र तळगड किल्ला, कुडा लेणी विकास कधी होणार? असा सूर निघत असून गडप्रेमी,पर्यटक नाराजी पसरली जात आहे.तरी मा.पर्यटन राज्य मंत्री अदितीताई तटकरे यांनी तळगड किल्ला संवर्धन, पुरातन वस्तू संग्रहालय अधिकाधिक निधी उपलब्ध करून तळगड किल्ला व कुडा लेणी पर्यटनाच्या दृष्टीने नकाशावर घ्यावी अशी मागणी केली जातआहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा