तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

 


पाभरे ग्रामपंचायत सरपंच पदी अनिल बसवत, लिपणीवावे सरपंचपद रसिका वाघरे आणि केलटे येथील सरपंच पदाची माळ गणेश बोर्ले यांच्या गळ्यात

म्हसळा : 15 जानेवारी 2021मध्ये तालुक्यातील पाभरे,लिपणीवावे आणि केलटे ग्रुप ग्राम पंचायतीच्या संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता प्रस्थापित केली आसुन सरपंच पदाचे आरक्षण सोडती नंतर आज रोजी संपन्न झालेल्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होऊन 11 सदस्य संख्या असलेल्या पाभरे ग्राम पंचायत सरपंचपदाचे सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पाभरे गण अध्यक्ष अनिल बसवत यांची सरपंच पदी तर उप सरपंच पदावर मझर काझी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

लिपणीवावे ग्रुप ग्राम पंचायत सरपंचपद महिलांना राखीव जागा करिता श्रीमती रसिका वाघरे यांची सरपंच पदावर तर मारियम खारगाव येथील आकाश गोरीवले यांची उपसरपंच पदी नियुक्ती करण्यात आली.तालुक्यातील बिनविरोध सदस्य निवड झालेल्या केलटे ग्राम पंचायतीच्या सरपंच पदावर बोर्ले परिवाराने आपली छाप कायम ठेवली आसुन सर्वसाधारण आरक्षित असलेल्या सरपंच पदी गणेश सुरेश बोर्ले यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदासाठी श्रीमती स्नेहाली शंकर पिचुरले यांची बिनविरोध निवड झाली.

 

नव्याने सरपंच, उपसरपंच पदावर स्थापित झालेल्या लोकप्रतिनिधी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते अली शेट कौचाली,तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा परिषदेचे सभापती बबन मनवे,तालुका सभापती उज्वला सावंत,उपसभापती मधुकर गायकर,माजी सभापती छाया म्हात्रे,प.स.सदस्य संदीप चाचले,माजी जिप सदस्या वैशाली सावंत,युवक अध्यक्ष फैसल गीते,युवक मतदारसंघ अध्यक्ष संतोष पाखड,ओबीसी सेल विभागीय अध्यक्ष गजानन पाखड,जेष्ठ नेते अंकुश खडस, व्यंकटेश सावंत,रामचंद्र बोर्ले आदी मान्यवरांनी शुभेच्छा देवुन अभिनंदन केले आहे.सरपंच, उपसरपंच निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांचे अधिकारात काम सुरळीत पार पडले.

 

म्हसळा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीत पाभरे,लिपणीवावे आणि केलटे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असल्याने खासदार सुनिल तटकरे यांनी पालकमंत्री तथा श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकास निधींतुन वरील ग्राम पंचायतीना अनुक्रमे 15 आणि 10,10 लक्ष रुपयांचा विकास निधी घोषित करून पक्षाचे मार्फत सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा