ई.पी.एफ.-९५च्या पेन्शन धारकांचे खासदार सुनिल तटकरे यांना निवेदन सादर.




तळा(किशोर पितळे)महाराष्ट्र औद्योगिक सेवा निवृत्त कर्मचारी संघटना रायगड माणगांव युनिटच्या वतीने मा.खासदार सुनिल तटकरे यांना ईपीएफ-९५पेन्शन
वाढीव मिळावी. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा
करूनही केंद्र सरकार आमच्या पेन्शनची हक्काची
पेन्शन देण्यात अकार्यक्षम आहे. मा.खासदार हेमा मालीनी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याची भेट
घेऊन असंघटीत सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न केला आहे.तसेच प्रकाश जावडेकर (भाजपा प्रवक्ता)यांनी फेब्रुवारी२०१४साली ९०दिवसांत मिळाली जाईलअसे आश्वासन दिले होते. 

मात्र त्या सरकारने पेन्शर्नच्या तोंडाला पाने पुसली.
ई पी एफ.-९५ची रक्कम राज्य सरकार कडून केंद्र सरकारकडे वर्ग होत असते कोट्यवधी रक्कम पडून आहे मा.कोश्यारी समीतीच्या शिफारशी मान्य करतील अशी अपेक्षा होती.या समीतीचे १६खासदार असून मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अध्यक्ष  आहेत पंरतु हे प्रकरण अधांतरीच आहे. सद्यस्थितीत मिळणारी पेन्शन हि तुटपुंजी रू१०००/-ते ३०००/-इतकी च आहे ती किमान ७५००/-अधिक महागाई भत्ता सह प्रतीमाह१०००/-मेडीकल भत्ता मिळावा अशी मागणी आहे.काही सदस्य हे वयोवृद्ध आहे तर काहीचे निधन पावले आहेत.मग ही पेन्शन मिळणारतरी कधी या विवंचनेत आहेत.ती येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारचे लक्ष वेधून त्वरीत न्याय मिळावा या प्रमुखआणी इतर मागणी साठी मा.खासदार सुनील तटकरे यांना निवेदन माणगांव येथे देण्यात आले. यावेळी खासदार तटकरे यांनी सांगितले की येत्या अधिवेशनात पेन्शनचा अधिकाधिक लाभ लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण सोपानअंबुर्ले, युनिट कार्याध्यक्ष विजय कदम,सचिव रमेश बक्कम सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा