शारीरिक शिक्षण शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

खासदार  सुप्रियाताई सुळे यांनी घेतली  विशेष  दखल 

मुंबई - महाराष्ट्र  राज्य  युवा शारीरिक  शिक्षण  शिक्षण  शिक्षक महासंघ यांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंञालयीन भेट घेऊन  मुंबई  विद्यापीठ  शारीरिक  शिक्षण  संचालक  पद आणि  शालेय  स्तरावर शाळा तेथे शारीरिक  शिक्षण  शिक्षक असावा , क्रीडा धोरण २०१२, नविन शैक्षणिक  धोरणामधे शारीरिक  शिक्षण  विषयाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासंबंधी चर्चा करुन निवेदन  देण्यात  आले.

यावेळी युवा महासंघाचे अध्यक्ष संदीप मनोरे, जेष्ठ मार्गदर्शक डाँ. दिपकदादा  पाटील-डांगे , विनोद पाटील , विलास सातपुते, शरद मोरे, तायाप्पा शेंडगे यांचे  शिष्टमंडळ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिक्षणमंञी वर्षाताई गायकवाड व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब यांच्याकडे योग्य कार्यवाहीसाठी सूचना केली. 

त्याचप्रमाणे वरील प्रमुख  प्रश्नांसंदर्भात YCM  मुंबई  येथे  खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात  आले.त्यांनी विशेष  दखल  घेतली असल्याचे महाराष्ट्र राज्य  युवा शारीरिक  शिक्षण  शिक्षक  महासंघाच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा