जिल्हयातील दुय्यम निबंधक म्हसळा व श्रीवर्धन कार्यालये सुट्टीच्या दिवशी राहणार सुरू




(म्हसळा प्रतिनिधी):- दुय्यम निबंधक म्हसळा व श्रीवर्धन या कार्यालयातील वारंवार खंडित होणारी कनेक्टीव्हीटी तसेच दस्त नोंदणीचे प्रमाण याचे अवलोकन केले असता नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याच्या दृष्टीने दुय्य्म निबंधक,म्हसळा हे कार्यालय शुक्रवार, दि.25 डिसेंबर 2020 व रविवार, दि. 27 डिसेंबर 2020 या दिवशी तसेच दुय्य्म निबंधक कार्यालय, श्रीवर्धन हे कार्यालय शनिवार,दि. 26 डिसेंबर 2020 रोजी दस्त नोंदणीकरीता सुरु ठेवण्यात येणार आहेत.
याचा लाभ दुय्यम निबंधक, म्हसळा व दुय्यम निबंधक, श्रीवर्धन या कार्यालयात दस्त नोंदणी करण्यास येणा-या नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. शैलेंद्र साटम,सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा