म्हसळा वाहतुक कोंडी :म्हसळाकर व पोलीस प्रशासन एकत्रित सोडविणार समस्या.
माल वाहतुक, पर्यटक व सार्वजनिक प्रवासी वाहनाना एकेरी मार्गाचा करावा लागणार अवलंब.
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शाहरातील अरूंद रस्ते,वाढती रहदारी,व्यवसाय, बाजारपेठेतील ग्राहकांची, दुचाकी, तीनचाकी या सर्व वाहनांच्या प्रचंड वर्दळी मुळे म्हसळा शहरांत सातत्याने वाहतुक कोंडीच्या समस्या निर्माण होत असे, या समस्येवर कायम स्वरुपी उपाय योजना करण्याचा निश्चय म्हसळा पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पो.नी.धनंजय पोरे व शहरांतील विविध व्यापारी ,वहातुकदार, कापड - किराणा व्यापारी संघटनानी एकत्रित येऊन शहरांतील वाहतुक कोंडीवर मात करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सुभाष उर्फ बाळशेट करडे, संजय खांबेटे,नंदूशेठ सावंत, खंगारशेट रजपूत,जब्बार शेट रजपूत, संतोष पानसरे,मनोहर तांबे,नदीम दळवी, फरीद मेमन, सादीक दरोगे, पप्पू जावळे, विवेक ढवळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक डूस , सुर्यवंशी, ट्रॅफीक हवलदारआदी मान्यवर उपस्थित होते.
मंगळवार दि.१५ डिसें.पासून असे असणार वहातुकीचे बदल.
मुख्यत्वे मुंबई, महाड, माणगाव -गोरेगाव कडून म्हसळा दिशेकडे येणारी ४ चाकांवरील सर्व माल वाहतुकीची वाहने ( उदा .ट्रक, टेंपो, ट्रॅक्टर व अन्य) , सार्वजनिक प्रवासी वाहने, ( उदा.एस. टी. बस, स्कुल बस, ट्रॅव्हलर्स), आणि म्हसळयात न जाणारी पर्यटकांची सर्व छोटी मोठी वाहने म्हसळा बायपास्ट न्यू इंग्लीश स्कुल, दिघी नाका असा एकेरी मार्गाचा वापर करतील. त्याच मार्गाने एकेरी मार्गाचा अवलंब म्हसळा शहरांत शिरणारी माल वाहतुकीची वाहने करतील असा सर्वानुमते निर्णय घेतला.
Post a Comment