टीम म्हसळा लाईव्ह
लॉकडाऊनंतर गेल्या काही दिवसात श्रीवर्धन तालुक्यात पर्यटनामध्ये एक कमालीची वाढ दिसुन येत आहे.श्रीवर्धन तसा निसर्गाच्या कुशीत वसलेले पण इथे येईपर्यंत पर्यटकांना नाकीनऊ येतात..खडबडीत असा मुंबई गोवा महामार्ग तसेच माणगाव येथुन आतमध्ये आल्यानंतर कोणतेही दिशादर्शन नसलेले फलक पर्यटकांच्या त्रासात वाढ करीत आहेत.म्हसळा येथे आल्यावर पर्यटकांना बायपास मार्गे पाठवल्यावर कळत नाही दिवेआगरला कसे जायचे.काहीजण पार श्रीवर्धन जवळ पोहोचतात रात्रीचा प्रवास करणार्या अनोळखी लोकांना तर काहीच कळत नाही.रेंज नसते,google Map ही नांगी टाकतो अशावेळेस पर्यटकांची फार विचित्र अवस्था होते.श्रीवर्धन शहरातही तीच आवस्था.श्रीवर्धन शहराची रचनाही फार सुंदर आहे.काटकोनात मिळणारे रस्ते त्यामुळे लोकांना समजत नाही ,कुठुन कसे जायचे ते.याठिकाणी योग्य फलक लावल्यास फायदा होईल.श्रीवर्धन मध्ये आलेला पर्यटक साधारणपणे 2 दिवस प्लान करून येतो.हरीहरेश्वर,श्रीवर्धन,दिवेआगर या पलीकडे दाखवायला काहीच नाही का.? जर व्यवस्थित माहिती काढुन विविध पॉईंट्स माहीतीसहीत तसेच viewing ग्यालरी बनवल्यास आपण पर्यटकाला साधारणपणे आठवडाभर तरी थांबवू शकतो.काही पॉईंट्स असे आहेत ते पर्यटकांना केवळ नशीबाने पहायला मिळतात .डॉक्टर बालाजी तांबे यांच्या इथुन दिसणारे समुद्राचे दर्शन केवळ दिवेआगरला जाणाऱ्या पर्यटकांना आणि तेही श्रीवर्धनमधून पर्यटक गेला तरच दिसेल हा छापील माहीतीचा आभाव आहे. भरडखोल येथून दिसणारे बोटींचा दृश्य तर आजुबाजुच्या वाढलेल्या झाडीमुळे दिसतच नाही.आणि दुर्दैवाने गुगलवर प्रसिद्ध असणारे फोटो पर्यटकाना प्रत्यक्ष अनुभवता येत नाही आणि तो अर्धवट आनंद घेऊन निघून जातो परत इतर लोकांना त्याचा review शेअर करतो. सोमजाईचे मंदीर अगस्ती ऋषींनी स्थापन केले आहे हे कुठेतरी त्याचठिकाणी लिहीले गेले पाहीजे.प्रदक्षिणा कशी करायची याची पद्धतही त्याठिकाणी हवेय.श्रीवर्धन म्हणजे मराठा साम्राज्याचा मानबिंदू पेशव्यांची जन्मभूमी मराठ्यांचे आनेक संस्थानांचे राजवाडे पहा बडोदा,तंजावर ,इंदोर इ. त्यांचा मूळ श्रीवर्धनला काय आहे तर एक पुतळा तोही आहे हे नशीब,स्मारकाचा उद्घाटनाचा पण फक्त फार्स झाला.बाकी जैसे थे. लव पॉईंटही काही जणांनीच पाहीलाय,नानवेलची बत्ती (light house) एक माहीतीपूर्ण ठिकाण पण भेट देउन आलेले लोकल थोडेच असतील.जाकमाता कडा,मदगड किल्ला,देवखोल,कुडकी धरण,कोंढे धरण,आदगाव येथील समुद्रातील खडकावरील मंदीर,वाकळघर येथील गंगादेवी कुंड, हरीहरेश्वर बागमांडले विभागातील स्थळ अश्या आनेक गोष्टी आहेत. स्थानिकांनीच एकत्र येऊन आपल्या पर्यटनाच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत.श्रीवर्धन तालुक्याच्या एंट्री पॉईंट्सलाच एखादा छापील pamplet पर्यटकांना मिळाला तर आनेक गोष्टी explore होतील आणि आणि स्थानिकांना याचा नक्कीच फायदा होईल.कारण फक्त Weekend आणि seasonal विचार करून चालणार नाही.weekdays आणि पुर्ण वर्षभर पर्यटक आले पाहीजेत याचा नियोजन स्थानिक व्यक्तीनीच करायला पाहिजे.आत्तापासून प्लानिंग केल्यास पुढील सहा महीन्यात त्याची फळे आपल्याला चाखायला मिळतील.सकारात्मक होवुया.
Post a Comment