महाड (वार्ताहर) संपुर्ण कोकणात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महाडमधील अंजुमन दर्दमंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट या संस्थेच्या वतीने गेली चार महिने कोरोना संसर्गाच्या काळात फ्लू क्लिनिक मार्फत विविध प्रकारच्या आजाराचे रुग्णांवर मोफत उपचार करून त्यांना लागणाऱ्या औषधे इंजेक्शन व गॅस चा मोफत पुरवठा केला गेला या फ्लू क्लिनिकमध्ये गेली चार महिन्यात सुमारे ५ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. या फ्लू क्लिनिक मधील सेवेचा समारोप आणि ही रुग्ण सेवा देणाऱ्या वैद्यकिय सेवक आणि त्यांना मदतीचा हात देणारे आरोग्य सेवक स्वयं सेवकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान सोहळा गुरुवार दि ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना महाडच्या प्रांताधिकारी पुदलवाड यांनी कोणत्याही आपत्तीमध्ये मदती साठी सर्वप्रथम धावून येणाऱ्या अंजुमन दर्द मंद या संस्थेचे कार्य वाखणण्याजोगे आहे असे गौरवोदगार काढले. महाड पोलादपूर तालुक्यातील सावित्री पुल दुर्घटना आंबेनळी बस अपघात आणि तारीक गार्डन दुर्घटनेच्या वेळी तळमळीने आपदग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे काम अंजुमन दर्दमंद संस्थेने करून शासनाला सहाय्य केले त्याच प्रकारचे सहकार्य भविष्यातही या संस्थेकडून मिळावे अशी अपेक्षा प्रांताधिकारी श्रीम पुदलवाड यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी व्यासपीठावर डिवायएसपी तांबे तहसिलदार सुरेश काशिद गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव सीईटीपी / एम एम ए चे व्यवस्थापक काळे अंजुमन संस्थेचे अध्यक्ष मुक्ती रफीक पुरकर माजी नगराध्यक्ष महम्मद अली पल्लवकर शिवसेनेचे महाड शहर प्रमुख नितीन पावले जमातुल मुस्लिमीन महाडचे अध्यक्ष अकबर तरे सेक्रेटरी अकबर ताज सत्तार तरे डॉ फैसल देशमुख मुक्ती मुजफ्फर सेन दै रायगडचा आवाज चे संपादक दिलदार पुरकर आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी डिवायएसपी तांबे यांनी कोरोना विरुद्ध ची लढाई ही एकट्या दुकट्याची नसून ती एकजुटीने लढण्याची गरज आहे या लढ्यात पोलिस खात्यातील अनेक अधिकारी कर्मचारी यांना आपला प्राण गमवावा लागला मात्र त्या नंतरही मागे न हटता पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांनी या काळात आपली कामगिरी बजावली आणि भविष्यातही आमच्या कर्तव्या साठी पोलिस तत्पर राहतील याची खात्री दिली अंजुमन दर्द मंद संस्थेने फ्लु क्लिनिक व्दारे विविध रुग्णांवर केलेले उपचार करून जनतेला जो दिलासा दिला तो कौतुकास्पद असल्याचे तांबे यांनी सांगितले.
तहसिलदार काशिद यांनी अंजुमन दर्दमंद सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळेच शासन आजपर्यत कोरोना महामारीला अटकाव करू शकले केवळ शासनाला या महामारीला मात देणे शक्य नव्हते फ्लू क्लिनिक सुरु करून वैयक्तिक रित्या रुग्णांवर उपचार करण्याचे अंजुमन संस्थेने केलेल्या धाडसामुळे शासकिय आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण कमी झाला असे सांगत आपत्ती मध्ये एकमेकांना जातीपातीच्या पलीकडे जाऊन मदत करण्याचा महाड चा सलोखा यापुढेही सुरु ठेवा असे आवाहन तहसिलदार यांनी केले
गटशिक्षणाधिकारी यादव यांनी आपल्या विनोदी शाब्दीक फटकेबाजीतून हास्याचे फवारे उडवले चांगला माणूस बनणे कठीण असते मात्र ते अशक्य नसते हे आदर्श माणुस बनवून मानवतेचा धर्म पाळणाऱ्या अंजुमन दर्दमंद संस्थेने जगाला दाखवून दिले आहे या संस्वेच्या फ्लू क्लिनिक मध्ये आरोग्य सेवा देणारे डॉक्टर आरोग्य सेवक व स्वयं सेवकांच्या कुटुंबियांचे यादव मॅडम यांनी आभार व्यक्त केले कोरोना व्हायरसने आपल कोण आणि परके कोण हे शिकवले त्याच प्रमाणे स्वच्छता काय खावे काय खाऊ नये हे शिकवत प्रत्येकाला आत्मनिर्भर बनवले त्याचप्रमाणे आपली भारतीय जुनी संस्कृती योग्य होती हे पटवून दिले कोरोना योध्यांमुळे हजारो लोकांचे प्राण वाचले त्यामुळे या योद्धाचे आणि अंजुमन च्या कार्याचे यादव मॅडम यांनी कौतुक केले
यावेळी महमद अली पल्लवकर डॉ फैसल देशमुख नितीन पावले यांनी आपल्या मनोगतातून अंत्रुमन च्या कार्याचे कौतुक केले.
आपल्या अध्यक्षिय भाषणात मुफ्ती रफीक पुरकर यांनी कोरोना महामारीचे काळात ज्यावेळी काही खासगी डॉक्टरांचे दवाखाने बंद होते आणि पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी उपचार करणे ज्यांना परवडत नव्हते असे रुग्ण कोरोनाच्या भितीमुळे उपचारासाठी घरा बाहेर पडायला कचरत होते यावेळी या जनतेच्या मनातील भय काढून टाकून त्यांचेवर मोफत उपचार करण्याचे धाडसी पाऊल कोकणी डॉक्टर असोसिएशन व डॉ. फैसल देशमुख जमातुल मुस्लिमीन यांच्या सहकार्यामुळे टाकले या फ्लु क्लिनिक मध्ये ५ हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले त्यासाठी संस्थेला १८ लाखाचा खर्च करावा लागला मात्र या रुग्णांना मुंबई पुणे या ठिकाणी उपचारासाठी लागणारा करोडो रुपयांचा खर्च आम्ही वाचवू शकलो याचे समाधान असून या क्लिनिकचा फायदा तालुक्यातील हिंदु मुस्लिम बांधवांना झाला या क्लिनिक मध्ये स्वयं सेवकांचे काम करणाऱ्या मुस्लिम तरुणांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे उपचारा साठी लागणारा निधी त्यांच्या स्वतः च्या खिशातून आणि देणगीदारांकडून गोळा केल्यानेच ही सेवा देणे शक्य झाले असे मुफ्ती पुरकर यांनी सांगितले. सुत्रसंचलन मुफ्ती मुजफ्फर सेन यांनी केले, शेवटी आभार कारी उस्मान कारभारी यांनी मानले.
Post a Comment