म्हसळा दिघी रोड वरील फर्निचर कारखान्याला रात्री अकस्मात आग प्रशासनात नोंद नाही



संजय खांबेटे  म्हसळा
म्हसळा शहराचा चारही बाजूने प्रचंड विकास होत असून बाजारपेठेत सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे. यातच काल मध्यरात्री दोनचे सुमारास म्हसळा दिघी रस्त्यावरील कदम फर्निचर कारखान्याला आग लागण्याची घटना घडली. मालक नथुराम कदम यानी घटनेची फिर्याद अद्यापही दिली नसल्याचे समजते.रात्री २ वाजण्याच्या सुमारास कदम फर्नीचर यांच्या लाकडी विविध वस्तू बनविण्याच्या कारखान्याच्या गाळ्यांतून धूर येत आसत्याचे दिसल्याने येथील नागरीकानी तैबाकॅटरर्स
चे मालक व सामाजिक कार्यकर्ते नईम दळवी याना घटनेची माहीती दिली त्यानी तात्काळ इर्शादभाई तांबे, जुनेद खान, शरीफ काका,बाबु खान, सोनू अली,फैझान दामाद, आसिफ आली या आपल्या मित्र परिवार व म्हसळा पो.स्टेशनचे ठाणे अमलदार शामराव कराडे, रावजी राठोड, कैलास होडशीळ विक्रम सुंदर्डे व विजय फोकसे या पोलीस कर्मचाऱ्यानी विशेष मदत केल्याचे दळवी यानी सांगितले.आग शॉर्टसर्किट मुळे लागली असावी अशीही चर्चा सुरू आहे. पोलीस पंचनामा वगैरे प्रकार न झाल्यामुळे कदम यांचे नुकसान किती झाले असावे हे स्पष्ट होत नाही. दळवी व अन्य मंडळीनी मदत केल्यामुळे आग आटोक्यात आली असे उपस्थितानी सांगितले.

" प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात जळीत रजीस्टर हा महच्वाचा अभिलेख असतो, त्या रजीस्टर मध्ये अकस्मात आग या विषयीच्या घटना नोंदविल्या जातात, त्याचा गुन्ह्याच्या तपासासाठी उपयोग होऊ शकतो"
" घटनास्थळी प्रत्यक्ष आग विझवण्यास मदत करणाऱ्या पोलीस कर्मचारानी उल्लेखनीय काम करूनही प्रशासकीय कर्तव्याचा भाग म्हणून सदर घटनेची माहीती तहसीलदार तथा अपत्कालीन मियंत्रण प्रमुख अथवा स्थानिक कक्ष व नगरपंचायत प्रशासन याना देणे महच्वाचे असते त्याची पूर्तता दिवसभरांत झाली नसल्याचे समजते"

सदरच्या आगीच्या घटनेची म्हसळा पोलीसांत अद्यापही कोणीही तक्रार अगर फिर्याद न दिल्याने नोंद करण्यात आली नाही"
धनंजय पोरे,स.पो.निरिक्षक ,म्हसळा पोलीस स्टेशन

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा