एकाच रात्रीत दोन मोबाईल शॉपीला लक्ष करणाऱ्या चोराला म्हसळा पोलीसानी केले जेरबंद
शहरांत म्हसळा पोलीसांचे होत आहे कौतुक.
( म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळयातील चोट्यानी दोन मोबाईल शॉपी फोडल्याची घटना घडली त्यातील सौरभ मोबाईल शॉपी ही सराफी बाजारातील व पोलीस स्टेशन पासून केवळ २०० फूटावर होती .यामध्ये चोरट्यानी दुकानाची कौले काढून मोबाईल शॉपीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता तर बीलाल इमाम शेख ,नवानगर यांचे मोबाईल टपरीचा मागील बाजूचा पत्रा वाकवून चोरट्यानी टपरीत प्रवेश करून १मोबाईल, ४ब्ल्यूट्यूथ,१स्पीकर,१ब्ल्यूटूथ हेड फोन व रोख रक्कमअसा रु३८०० चा माल लंपास केला होता. या बाबत म्हसळा पोलीसानी गुर.नं.५४/२०२०भादवी ४६१,३०८ प्रमाणे गुन्हा नोंदविला होता. म्हसळा शहरांतील मुख्य बाजारपेठेतील रहदारीच्या ठीकाणवरील एकाच रात्रीतील दोन घरफोडया आसल्याने म्हसळा पोलीसांपुढे हे अवाहन होते. सपोनी धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा संतोष चव्हाण यांच्या पथकांत शशीकांत कासार, पो.ना.सुर्यकांत जाधव, पो.शि.मल्हारी तोरसल्ले,पो.शि.विजय फोपसे,यांचे पथक नेमले होते, या घरफोडी मध्ये वय वर्ष २० चातरुण आरोपी पथकाने ताब्यात घेतला असूनसदर आरोपीला मा. प्रथम न्याय दंडाधिकारी साो यांचे न्यायालयांत हजर केला असता बुध दि ११ नोव्हों पर्यत आरोपीला पोलीस कस्टडी मिळाली आहे.
फोटो. :सौरभ मोबाईल शॉपी ची कौले काढून चोरट्याने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे छाया चित्रांत दिसत आहे.
Post a Comment