बोर्लीपंचतन येथे स्वच्छता मोहीम ; डाॕ.राजेश पाचारकर मित्रमंडळाचे एक पाऊल स्वच्छतेसाठी
मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
आरोग्य,शैक्षणिक व सामाजिक कार्यात आपल्या मित्रमंडळाच्या साथीने सामाजिक जाणिवेतुन बोर्लीपंचतन येथे वेगवेगळे उपक्रम राबविणारे बोर्लीपंचतन येथील सेवाभावी व्यक्तिमत्व डॉ.राजेश पाचारकर यांनी आपल्या मित्रमंडळाच्या सहकार्याने बोर्लीपंचतन येथील जोशी हाॕस्पीटल ते बस स्थानक (होळी मार्गे) रस्त्याची "एक पाऊल स्वच्छतेसाठी" या उपक्रमा अंतर्गत डाॕ.राजेश पाचारकर मित्रमंडळ व बालवीर क्रिडा मंडळ बोर्लीपंचतन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना पार्श्वभुमिवर आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन करुन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी या रस्त्याच्या दुतर्फा व या रस्त्यावर असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा या परीसरात वाढलेले गवत छोटी झुडपे व इतर कचरा याची स्वच्छता करुन जमा झालेला सर्व कचरा वाहतुक करुन कचरा डेपोमध्ये टाकण्यात आला.
सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला खुप महत्व प्राप्त झाले आहे,त्याचबरोबर अनेक रोगांचे कारण म्हणजे अस्वच्छता आहे.या सर्व गोष्टीना आळा बसावा व सर्वांना स्वच्छतेचे महत्व समजावे या हेतुने डाॕ.राजेश पाचारकर यांनी हा उपक्रम राबवीला.गावात स्वच्छता मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून,यामुळे गाव निर्मळ व निरोगी होण्यास मदतच होईल अशी आशा त्यांनी व्यक्त करुन आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. डाॕ.राजेश पाचारकर आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने करीत असलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडुन कौतुक होत आहे.
Post a Comment