खरसई येथील सत्संग भवन मध्ये आपत्कालीन रक्तदान
रवींद्र पेरवे : खरसई
‘निरंकारी सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज’ यांच्या असिम कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (SNCF) आयोजित ‘श्रीवर्धन व म्हसळा’ सेक्टर द्वारे रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले.
म्हसळा तालुक्यातील खरसई येथील संत निरंकारी सत्संग भवन मध्ये हे शिबिर संपन्न झाले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रायगड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय रक्तपेढी मार्फत साधारण 100 युनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन खरसई गावचे सरपंच निलेश मांदाडकर यावेळी उपसरपंच इम्रान आकलेकर, महेश गणेकार, महादेव लेपकर, अमोल पाटील तसेच जिल्हा रुग्णालय शासकीय रक्तपेढी चे दीपक गोसावी व हेमकांत सोनार उपस्थित होते.
रायगड जिल्हा झोनल प्रभारी म. प्रकाशजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. कोरोना व्हायरस या आजाराने महाराष्ट्रात थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या असून याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे. रक्तपेढी यांच्या आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देण्यात आले.
याच प्रकारचे रक्तदान शिबीर इतर कालावधी त देखील विविध भागामध्ये निरंकारी मिशन तर्फे आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार संत निरंकारी मंडळाकडून देण्यात आले.
Post a Comment