म्हसळ्यात आयपीसी कलम ३५४ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल



संजय खांबेटे :  म्हसळा
म्हसळा तालुक्यांत महीलां विषयी छोड-छाड , विनयभंग या बाबत घटना वाढत असताना खामगाव येथील २० वर्षाचे अविवाहीत मुलीने तक्रार दिल्याने म्हसळा पोलीसानी गु.र.न.५६ भा.द.वी ३५४ (अ) प्रमाणे रोहन चंद्रकांत पवार वय २०रा. खामगाव आदीवासी वाडी याला अटक केली आहे. तक्रारदार झोपली असताना आरोपी तीच्या घरांत शिरला व मुलीच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचे ठाणे अमलदार कैलास होडशीळ यानी सांगितले. सदर गुन्हाचा तपास पोहेकॉ मिलींद सुर्वे करीत आहेत.

कायदा काय म्हणतो? व शिक्षेचं स्वरूप काय?
कलम ३५४- विनयभंग - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न (१ ते ५ वर्षाची शिक्षा).
कलम ३५४ (बी) - विनयभंग करण्यासाठी हल्ला करणं (३ ते ४ वर्षे शिक्षा).
कलम ३५४ (सी) - महिलांना कपडे बदलताना (३ ते ४ वर्षे शिक्षा).
कलम ३५४ डी - पाठलाग करणं (हे कृत्य एकदा केल्यास, पहिल्यांदा ३ वर्षे, तर दुसऱ्यांदा केल्यास ५ वर्षे शिक्षा होऊ शकते.)
कलम ३५४ अ - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं (या बळजबरीसाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते.)
लैंगिक छळ म्हणजे नेमकं काय? लैंगिक छळ का केवळ शारीरिक असतो का? शाब्दिक आणि मानसिक लैंगिक छळ असतो का? अशा अनेक प्रश्नांची कायदांत दखल घेतीली जाते
महिलांच्या सुरक्षेसाठी देशाच्या संविधानात अनेक कायदे आहेत.
अँड. मुकेश पाटील, म्हसळा.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा