पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या पाठपुराव्याने रोहा तालुक्यासाठी रक्त साठा केंद्र मंजूर
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याने अखेर रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठा केंद्र मंजूर झाले आहे.
रोहा तालुक्यातील नागरिकांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची या विषयाबाबत नुकतीच भेट घेतली होती. रोहा व आजूबाजूच्या परिसरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील गरजू नागरिकांसाठी रक्ताची गरज भासल्यास त्यांना तात्काळ रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रोहा तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना रक्त साठा केंद्रासारखी आवश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे.
या रक्त साठा केंद्रासाठी अन्न व औषध विभागाकडून एक वैद्यकीय अधिकारी व एक रक्तपेढी तंत्रज्ञ अशा दोन अधिकारी-कर्मचाऱ्याची नियुक्ती तात्काळ करण्यात आली आहे.
Post a Comment