म्हसळा तहसील कार्यालयाचा बंद महादरवाजा अखेर उघडला


म्हसळा तहसील कार्यालयाचा बंद महादरवाजा अखेर उघडला ; तालुका प्रमुख महादेव पाटील यांची होती मागणी

संजय खांबेटे : म्हसळा 

देशांत व राज्यांत कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले लॉकडाउन बहुतांश ठिकाणी संपत आले तरी म्हसळा तहसील कार्यालयाचा मुख्य दरवाजा ( लॉकडाउन) आजपर्यंत बंद ठेऊन संपेना त्यामुळे म्हसळा महसुल विभागाचे अनलॉक होणार कधी अशी नागरिकांच्यात सतत चर्चा होती. त्या अनुषंगाने म्हसळा तालुका शिवसेना प्रमुख महादेव पाटील यानी तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद का?शासन अनलॉकचे विविध टप्प्यांत बहुतांश कारभार खुला करीत असताना कोणत्या कारणाने प्रशासकीय इमारतीचा मुख्य दरवाजा आपण बंद करुन ठेवला असा सवालही महादेव पाटील यानी प्रशासनाला केला ? प्रशासकीय इमारतीच्या या मुख्य दरवाजाने तालुक्याचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन व वन विभागाचे कार्यालयांत कार्यालयीन कामास जाण्यास नागरीकाना अडसर होत होता.त्यामुळे विविध कामाचा पाठपुरवा होण्यास लोकप्रतिनिधी ना सुद्धा विलंब होत होता.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा