फोटो : सराफी बाजारातील सायली मोबाईल शॉपीच्या छफ्पराची कौले काढलेली दिसत आहेत.
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरांत चोरटे सक्रीय झाले असून काल मंगळवार दि. २० चे पहाटे चोरट्यानी दोन मोबाईल शॉपीत फोडल्याची घटना घडली त्यातील सायली मोबाईल शॉपी ही सराफी बाजारातील व पोलीस स्टेशन पासून केवळ २०० फूटावर असून चोरट्यानी दुकानाची कौले काढून मोबाईल शॉपीमध्ये प्रवेश केला परंतु पोटमाळ्याला असणाऱ्या फळ्या व दुकानाचे सिलींग यामुळे चोरटे मोबाईल शॉपीमध्ये शिरू शकले नाही, चोरट्याना आपण अयशस्वी झाल्याची चिड येऊन त्यानी आपले लक्ष दुसऱ्या मोबाईल शॉपीवर वळवले तेथे त्याना केवळ रु ३८०० चा माल मिळाल्यामुळे भविष्यात ते आपली नजर म्हसळा बाजारपेठ सराफी बाजारावर केंद्रीत करण्याची शक्यता आहे. या संदर्भात म्हसळा पोलीसात श्रीवर्धन रोडवरील नवानगर मधील बिलाल इमाम शेख यांचे मोबाईल टपरीचा पत्रा उचकटून चोरी झाल्याची तक्रार दाखल केली सदर गुन्ह्याची 'म्हसळा पोलीसानी गु.र.नं ५४ भा.द.वि.४६१,३८० प्रमाणे गुन्हा नोंदऊन पोलीस चोरट्यांच्या मार्गावर आहेत. संबंधीत गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ.सदीप चव्हाण करीत आसल्याचे सांगण्यात आले
Post a Comment