उरण येथील वीज निर्मिती प्रकल्पाची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली पाहणी



 टीम म्हसळा लाईव्ह
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उरण येथील गॅस थर्मल पॉवर स्टेशनची आज पाहणी केली. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे वायू विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांमार्फत स्वागत करण्यात आले. 
       यावेळी  त्यांनी बोकडविरा येथील प्रकल्पातील पॉवर स्टेशनची पाहणी केली.प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना प्रकल्पाची माहिती देत तयार होणाऱ्या वीज उत्पादन केंद्राबाबत सादरीकरण केले.   
         यावेळी सातत्याने खंडित होणारी वीज आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळणेसंदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना स्थानिक गावकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा