म्हसळा तालुक्यात तटकरे कुटुंबीय श्रीवर्धन मतदार संघातील जनतेला न्याय देण्यास अपयशी: कृष्णा कोबनाक.
जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपवर तटकरे टीका करीत आहेत.
( म्हसळा लाईव्ह टीम )
म्हसळा तालुक्यात तटकरे कुटुंबीय जनतेला न्याय देण्यास अपयशी ठरल्यामुळे ते आता जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजप वर टीका करीत आहेत असे खरमरीत उत्तर भाजपचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य कृष्णा कोबनाक यांनी नुकतेच म्हसळा तालुक्यातील पाभरे पंचक्रोशी येथील श्री काळभैरव हिंदु देवस्थान ट्रस्ट मंदिराचे वाॅल कंपा़ऊंड सुशोभीकरण कामाचे भुमिपुजन कार्यक्रम प्रसंगी केली. यावेळीभाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, तालुका सरचिटणीस सुनील शिंदे, तालुका सरचिटणीस महेश पाटील, तालुका अध्यक्ष महिला मोर्चा सौ. सुनंदा पाटील, तालुका उपाध्यक्ष अनिल टिंगरे, तालुका उपाध्यक्ष लहू तुरे, तालुका उपाध्यक्ष समीर धनसे, तालुका चिटणीस दिलीप कोबनाक, तालुका चिटणीस मनोहर जाधव, तालुका उपाध्यक्ष महिला मोर्चा सौ. रुपाली भायदे, तालुका उपाध्यक्ष युवा शरद कांबळे व अन्य पदाधिकारी व पंचक्रोशीतील प्रमुख ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.
खासदार सुनील तटकरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात भाजपला लक्ष करत भाजपवर टीकेची झोड उठवली होती या टिकेवर जिल्ह्यांतील सर्वच भाजपा कार्यकर्ते खासदार तटकरे व पालक मंत्र्याना टिकेचे लक्ष करणार असल्याचे समजते श्रीवर्धन मतदार संघातील दुर्गम व दुर्लक्षित अशा म्हसळा तालुक्यात तटकरे येऊन भाजपावर खासदार तटकरे व कुटुंबीय टीका करतात परंतु आपण या तालुक्यात नक्की विकासकाम काय-काय केली ,त्यामिमीत्ताने म्हसळ्यासह मतदार संघात रोजगार निर्मीती बाबत काय केले याबाबत भूमिका मांडणे जरीरीचे होते.
निसर्ग चक्रीवीदकांत व नुकताच सुरू असलेला अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे सरकारने मदत करावी या प्रतिक्षेत शेतकरी आहेत या विषयी सुद्धा तटकरेनी कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही.
या उलट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किमान विकास तरी झाला व होत आहे, जनतेला काही प्रमाणात मदत ही झाली, केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग ,राष्ट्रीय पेयजल अशा विविध योजना दिल्या,गरीब कल्याण योजनेतून रेशन दिले, शेतकरी बांधवांना थेट मदत केली. निसर्ग चक्रीवादळ करिता एनडीआरएफ योजनेतून पैसे दिले ते तुम्ही केवळ वाटले, आयुष्यमान भारत सारख्या योजना दिल्या याबाबत कौतुक होणे गरजेचे होते असे कोबनाक यानी सांगितले.
तटकरे साहेब जरा रायगड लोकसभा मतदार संघाला सांगा?
साहेब महाराष्ट्र सरकारमधील महाविकास आघाडी सरकारने रायगड मतदारसंघातील जनतेला काय दिले ? मुख्यमंत्री साहेब व त्यांच्या मंत्रीमंडळाने कोकणातील जनतेला काय दिले ते सुद्धा सांगा. करोनामु़ळे प्रचंड प्रमाणात बेरोजगारी कोकणात निर्माण झाली आहे यावर काय उपाययोजना केली आहे का? यावर न बोलता मंदिर कशाला उघडायचे, रेल्वे कशाला सुरू करायची, साहेब तुमच्या सरकारच्या दुर्लक्ष कारभारामुळे लोकांची उपासमार सुरु आहे जरा ल़क्ष दिले तर बरे होईल असे प्रश्न कृष्णा कोबनाक यांनी खासदार तटकरेंसमोर थेट उभे केले आहेत.
Post a Comment