तळा (किशोरपितळे)
तळा तालुका पंचायत समिती च्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अक्षरा कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे.खासदार सुनिल तटकरे पालकमंत्री आदिती तटकरे आ.अनिकेत तटकरे यांनी तळा तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत. त्यांनी केलेल्या विकासकांमुळे तळा पंचायत समितीवर पंचायत समिती स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कायम वर्चस्व असून यावेळी सर्व पंचायत समिती सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने पूर्णपणे राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ठरल्याप्रमाणे मागील सभापती देवकी लासे यांनी त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणूक २८ अॉक्टोंबर रोजी झालीयानिवडणूकीचे निर्वाचन अधिकारी म्हणून तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी यांनी काम पाहीले सभापतीपदाच्या निवडणूकीसाठी सौ.अक्षरा कदम यांचा अखेर पर्यंत एकच फॉर्म आल्याने अक्षरा कदम यांची सभापती पदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ अक्षरा कदम यांची बिनविरोध तळा पंचायत समिती सभापतीपदी निवड झाल्याने त्यांचे महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव उपसभापती गणेश वाघमारे माजी सभापती देवकी लासे माजी समाजकल्याण सभापती हिराचंद तांबे माजी सभापती नाना भौड ॲड उत्तम जाधव जिल्हा युवक राष्ट्रवादीकॉग्रेस युवक सचिव अनंत खराडे विलास कदम रवींद्र मांडवकर सचिन कदम आदी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे
Post a Comment