बौद्ध हितकारणी सभा तालुका श्रीवर्धन च्या वतीने
'धम्मचक्र प्रवर्तन' दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरना विनम्र अभिवादन
श्रीवर्धन
अशोका विजयादशमी हा दिवस खास आहे कारण हा दिवस अनेकांसाठी बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीला म्हणजेच १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही सोबती, अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन' केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.
सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत १९५६ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर १४ ऑक्टोबर तारखेला नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर सुमारे ५ लाख अनुयायींसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.
याच पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक श्रीवर्धन मध्ये तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले बौद्ध हितकरणी मुबई अधक्ष्य आयु संजय मोरे तसेच स्थानिक आधक्ष्य आयु एच आर जाधव कुमारी मयुरी राहुल गायकवाड कुमारी तेजस्विनी यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी आयु दीपक शिर्के,शीतल कासारे,अनुसया उंबरकर,प्रणाली येळवे, दिशा शिर्के,जयराम शिर्के,गौतम सारखे,नरेश मोहिते, राहुल गायकवाड उपस्थित होते.राज्य शासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या सर्व आचारसंहिता चे पालन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात
आली .
📣 *_म्हसळा लाईव्ह च्या बातम्या वाचणं झालं आता अधिकच सोपं.... म्हसळा लाईव्ह च 📲 मोबाईल अँप प्ले स्टोर वरून डाउनलोड करण्यासाठी क्लिक 👇🏻 करा..._*
https://bit.ly/2VyVBqx
⚡ _ताज्या घडामोडी तुमच्या whatsapp वर मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आजच Registere करा..._
https://forms.gle/nfhx6dJGk4AKT9gG9
Post a Comment