नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच शासकिय मदत मिळवुन देणार- भाजप तालुकाध्यक्ष संजय(आप्पा) ढवळे.




किरण शिंदे लोणेरे

काेराेना लाँकडाऊन मध्ये काेकणातील चाकरमानी गावाकडे परतले नाेकरीधंदा ठप्प झाल्याने बहुतांशी तरुण वर्गाने काेकणातील  शेतीचा आसरा घेण्याचे ठरवले त्यातच 3 जुन चे निसर्गचक्रीवादळाने घरादारांसहीत शेतीवरही सकंट काेसळले काेकणातील रायगड हे भाताचे काेठार समजले जाते,त्यातील बहुतांशी शेतकरी हा काेरडवाहु शेती करणारा आहे एका मागुन एक शेतीवरील संकटांनतर आँक्टाेबर महीन्यातील अवकाळी व परतीचा पाऊस भातशेती सह काेकणी शेतकऱ्यालाच झाेपवुन गेला असे म्हणने वावगे ठरणार नाही य़ा पावसाने तर शेतातील तुंबलेल्या पाण्यामुळे भाताला पुन्हा काेंब येऊन शेतकर्यांचे आताेनात नुकसान झाले .
19 आँक्टाे राेजी विधानपरीषदेचे विराेधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रायगडातील बहुतांशी भागाचा पाेलादपुर,माणगांव,पेण या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेताच्या बांधावर जाऊन पहाणी केली व प्रशासनास ताबडताेब पंचनामे करण्याचे आदेश दिले याच वेळी माणगांव तालुका दाैऱ्यावर असताना दरेकर यांनी माणगांव भाजप तालुकाध्यक्ष संजय(आप्पा) ढवळे यांना शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यास पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे सांगितले याच पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा उत्तरार्ध म्हणुन आप्पा ढवळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व माेर्चा व सर्व सेल यांच्या पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधत व प्रशासकीय अधिकाऱ्यांना साेबत घेत शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असल्याचे आप्पा ढवळे यांनी प्रसिध्दीपत्रक काढुन त्यात सांगितले आहे, व अतिव्रुष्टी मध्ये नुकसान झालेला एकही शेतकरी शासकिय मदतीपासुन वंचित राहणार नाही याची खबरदारी स्वत: मी जातीने लक्ष घालुन घेत असल्याचे देखील आप्पा ढवळे यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा