संजय खांबेटे : म्हसळा
मुसळे तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे ,संघटना वाढ करणे या महत्वाच्या गोष्टी संदर्भात संघटनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांचा मेळावा शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता पाचगाव आगरी समाज सभागृहात घेण्याचे नियोजित केले आहे.सदर मेळाव्यास आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ता आणि शिवसैनिक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आमंत्रण शिवसेना तालुकाप्रमुख महादेव पाटील यांनी प्रसीद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मेळाव्याला दक्षिण जिल्हाप्रमुख अनिलशेठ नवगणे, दाक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ,माजी आमदार अवधूत तटकरे, मा.आमदार तुकाराम सुर्वे, मा.जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा सेना प्रमुख विकास गोगावले, उपजिल्हा प्रमुख शामकांत भोकरे हे नेते मार्गदर्शन करणार आसल्याचे ता. प्रमुख महादेव पाटील यानी कळविले आहे.
Post a Comment