परतीच्या पावसामुळे लोणेरे गोरेगाव परिसरातील शेतकरी हवालदिल;परतीच्या पावसाने भातशेतीचं नुकसान : बळीराज्याचे डोळे पाणावले.
शासनाने तात्काळ मदत करावी- शेतकऱ्यांनची मागणी -विनायक उंडरे
राम सिताराम भोस्तेकर /माणगाव
रायगड जिल्हा माणगाव तालुक्यात गोरेगाव लोणेरे परिसरातील भातशेती परतीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अगोदरच निसर्ग चक्रीवादळामुळे लोणेरे गोरेगाव माणगाव तालुक्याचे खुप प्रमाणात हाणी झाली.त्यात अगोदर पासुन कोरोनाचे संकट ही चालु होते.या दोन्ही संकटातुन शेतकरी आता सावरायला लागेले होते.कोकणात विशेषत: लोणेरे गोरेगाव परिसरा मध्ये भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.ही भात शेती या वर्षी चांगली आली होती.भात पेरणी पासुन लावणी होऊन आता भात कापणी साठी तयार झाले होते.परंतु त्यातचं आताचं आलेल्या परतीच्या पावसाने संपुर्ण भात शेती उद्धवस्त झाली आहे.
हाता तोंडाशी आलेला पीक अचानक झालेल्या या पावसामुळे संपुर्ण उद्धवस्त झाला.त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न शेतकर्यांनसमोर आहे.शेती पेरणी,लावणी चा खर्च पण आता वसुल होणार नसल्याने पुन्हा आता भात कापणी चा ही खर्च शेतकर्याला स्वत:च्या खिशातुन करायला लागणार असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
कोरोना, निसर्ग चक्रीवादळ यामुळे आधीच नागरिकांकडे पैशांची चणचण आहे.माणगाव तालुक्यातील भातशेती शेवटच्या टप्यात असताना परतीच्या पावसामुळे पीक काळे पडणे,भाताची लोंब पाण्यात पडुन तो भात कुंजणे अशा अनेक आव्हानांना शेतकर्याला सामोरे जावे लागणार आहे.अशा प्रकारे शेतकर्याच्या वर्ष भराच्या नियोजनावर निसर्गानेच नांगर फिरवला आहे. या परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला शेतकर्याचा घास हिरावुन नेला आहे.आधीच निसर्गवादळा मुळे कर्ज बाजारी झालेला शेतकरी कर्जाची परतफेढ कशी करावी व वर्षभर प्रपंच कसा चालवावा हा भला मोठा प्रश्न शेतकर्या समोर आहे.यामुळे बळीराज्याचे डोळे आता मायबाप शासनाकडे लागले आहेत.
कोरोना मुळे चालु असलेली टाळेबंदी नंतर आलेला निसर्ग चक्रीवादळ यात अगोदरच बळीराजा भरडला गेलाय अाणि आता या परतीच्या पावसामुळे बळीराजांच हातातोंडाशी आलेला पीक भुईसपाट होऊन कष्टकरी शेतकऱ्यांचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा व शेतकर्याला आर्थिक मदत जाहीर करावी
- विनायक उंडरे
Post a Comment