रोटरी क्लब रोहा सेंट्रलचा खा. सुनिल तटकरेंच्या हस्ते सत्कार

रोहा (निखिल दाते)

कोरोना काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब रोहा सेंट्रलचा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्तेरोटरी क्लब रोहा सेंट्रलचा खा. सुनिल तटकरेंच्या हस्ते सत्कार

कोरोना काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब रोहा सेंट्रलचा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पावलावर पाऊल या आ. अनिकेत तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त महेश बामुगडे आणि रूपेश बामुगडे यांच्या दसबा फाऊंडेशनच्या  माध्यमातून आयोजित केलेल्या अनोख्या उपक्रमात सत्कार करण्यात आला.
सामाजिक दायित्वाचे यथोचित भान ठेवून कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल रोटरी क्लब रोहा सेंट्रलचा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
मार्च महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सातत्याने रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे कोरोनाकाळात समाजोपयोगी उपक्रम सुरू असून यामध्ये सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या  काळात गरजूंना  अन्नधान्य वाटप,मास्क व सेनिटायझर वाटप, आर्सेनिक अल्बमचे वाटप, उपजिल्हा रुग्णालय रोहे येथील कोव्हिड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या दोन संचांची दिलेली भेट, तेथील डॉक्टरांसाठी डिस्पोजेबल गाऊन, पीपीई किट, व अन्य साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन आदी उपक्रमांचा समावेश आहे.
रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी क्लब प्रेसिडेंट महेंद्र दिवेकर, सेक्रेटरी सुचित पाटील, ट्रेझरर परेश जैन, एएजी गणेश सरदार, डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटी मेंबर राकेश कागडा आदी उपस्थित होते. पावलावर पाऊल या आ. अनिकेत तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त महेश बामुगडे आणि रूपेश बामुगडे यांच्या दसबा फाऊंडेशनच्या  माध्यमातून आयोजित केलेल्या अनोख्या उपक्रमात सत्कार करण्यात आला.
सामाजिक दायित्वाचे यथोचित भान ठेवून कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल रोटरी क्लब रोहा सेंट्रलचा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
मार्च महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सातत्याने रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे कोरोनाकाळात समाजोपयोगी उपक्रम सुरू असून यामध्ये सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या  काळात गरजूंना  अन्नधान्य वाटप,मास्क व सेनिटायझर वाटप, आर्सेनिक अल्बमचे वाटप, उपजिल्हा रुग्णालय रोहे येथील कोव्हिड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या दोन संचांची दिलेली भेट, तेथील डॉक्टरांसाठी डिस्पोजेबल गाऊन, पीपीई किट, व अन्य साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन आदी उपक्रमांचा समावेश आहे.
रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी क्लब प्रेसिडेंट महेंद्र दिवेकर, सेक्रेटरी सुचित पाटील, ट्रेझरर परेश जैन, एएजी गणेश सरदार, डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटी मेंबर राकेश कागडा आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा