म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत दसऱ्यानिमित्त सरस्वती पूजनाचा कार्यक्रम



(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा सार्वजनिक वाचनालयात आज दसरा निमित्त वाचनालयाचे संचालक प्राध्यापक आर एस माशाळे यांच्या हस्ते सरस्वती व ग्रंथांचे पूजन करण्यात आले यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,ग्रंथपाल उदय करडे, सायली चौगुले,धनश्री नाक्ती, वाचनालयाचे हितचिंतक गणेश हेगिष्टे व अन्य वाचक वर्ग उपस्थित होता, यावेळी प्राध्यापक मशाळे यानी नवरात्रीच्या सणाच्या शेवटी येणारा दसरा हा नेहमीच नवीन वर्षासाठी प्रेरणा देणारा ठरतो. या दिवशी सोनं, चांदी, गाडी अशा नवीन वस्तू किंवा  इतर संपत्ती शुभमुहूर्तावर घेतल्या जातात असे सांगताना आपण आजच्या शुभमुहूर्तावर ग्रंथालयाचे परिगणन या विषयाला सुरुवात करू आवश्यकता वाटल्यास आम्ही संचालक मंडळ मदत करू असा संकल्प सोडला.
फोटो म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत दसऱ्यानिमित्त सरस्वती पूजन करताना

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा