संजय खांबेटे : म्हसळा
रायगड जिल्ह्यातील चौदा तालुक्यांतील 117 शाळांनासमग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सन२०-२१ साठी रुपये 404 .40 लक्ष रुपयांचा(अक्षरी चार कोटी चार लाख चाळीस हजार मात्र) निधी रायगाड जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे. त्यामध्ये अलिबाग 6, कर्जत 8,खालापूर 6.महाड 12,मुरुड 3,पनवेल 5 पेण16 पोलादपूर 4, सुधागड 14, माणगाव 9 ,म्हसळा 19 श्रीवर्धन 8,तळा 5 , उरण 2 अशा जिल्ह्यांतील I4 तालुक्यांतील117 मोठ्या शाळाना मंजुरी मिळाली आहे.
शासनाने दिलेले महत्त्वाचे निकष
१) शाळागृह दुरुस्तीचे काम हे शाळा व्यवस्थापन समितीने करणे बंधनकारक आहे.
२)शाळा दुरुस्ती कामासाठी असलेल्या प्रशासकीय रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करू नये.
३) शाळा गृह दुरुस्ती पूर्व व दुरुस्ती नंतरचा फोटो देयका सोबत देणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यांत म्हसळे तालुक्याला सर्वात जास्त 19 शाळांना सुमारे 50 लाखाचा निधी.
वारळ(उर्दू),बनोटी, चिरगाव, चिखलप, शीतपाचा कोंड, देवघर कुडतोडी गौळवाडी .केलटे, खारगाव खुर्द,खरसई (उर्दू) ,कुंबळे मांदाटणे,निगडी, पांगळोली मराठी, पांगळोली (उर्दू),रेवली, रोहिणी, ताडाचा कोंड, संदेरी या१९ शाळांना एकूण रु ४९ लक्ष ४० हजार रक्कम आली आहे.
फोटो : म्हसळा तालुक्यातील रोहीणी ,रेवली, यिरगाव व आगरवाडा या गावातील या शाळांची स्थिती छायाचित्रात दिसत आहे (छाया :संजय खांबेटे)
बाकीच्या शाळांना निधी कधी देणार?
ReplyDeletePost a Comment