इमारत दुर्घटना महाडची पुनरावृत्ती टळावी म्हणून म्हसळा तहसीलदारानी घेतली काळजी.
अबुसईद अपार्टमेंट इमारतीचे मालक व बिल्डरला नोटीस
संजय खांबेटे : म्हसळा
अबुसईद अपार्टमेंट इमारतीचे मालक शगुफ्ता धायरेकर याना तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन तालुका प्रमुख शरद गोसावी व मुख्य कार्यकारी कार्यकारी मनोज उर्कीडे यानी अनुचित घटना व जिवितहानी टाळण्यासाठी MRTP अँक्टने नोटीस दिली व अबुसईद अपार्टमेंट इमारतीमधील ५ कुटुंबाना स्थलांतरीत करण्यात आले आसल्याचे सांगितले. या कामी नगरपंचायत प्रशासनाने इमारतीचा वापर तात्काळ थांबवून सदरची इमारत त्वरीत पाडून वा दुरुस्त करून त्या संबंधीतले अधिकृत स्ट्रक्चरल अभियंता यांचे कडील MRTP१९६६ तसेच DCPR नियमाअर्तगत असलेले स्ट्रक्चरल ऑडीट सर्टीफिकेट नगरपंचायतीला सादर करण्याचे आदेश जमीन मालक शुगुफ्ता मुस्ताहिद धायरेकर, डेव्हलपर संदीप यशवंत पाटील व शाहीद अ.रहीम उकये याना दिले आहे.
इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम व मुख्य पिलरचे प्लॅस्टर पडत आसल्याबाबत समजताच तहसीलदार शरद गोसावी, अे. पी.आय धनंजय पोरे, Ceo मनोज उर्कीडे, मंडळ अधिकारी सलीम शहा, तलाठी कैलास पाटील, गजानन गीऱ्हे, शेळके, नगरपंचायतीचे संतोष कुडेकर, यानी घटनास्थळी तात्काळ भेट दिले.
इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम व मुख्य पिलरचे प्लॅस्टर पडत होते अशा पद्धतीच्या तक्रारी रहीवाशानी प्रशासनाकडे केल्याचे सांगण्यात आले.अबुसईद अपार्टमेंट २०१३ साली बांधण्यात आली आसल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment