महाराष्ट्रातील पहिली शासन अनुदानीत अद्ययावत ऑक्सिजन कंटेनर यंत्रणा माणगांवात कार्यान्वित


महाराष्ट्रातील पहिली शासन अनुदानीत अद्ययावत ऑक्सिजन कंटेनर यंत्रणा माणगांवात कार्यान्वित
पालकमंत्र्यांचे हस्ते उदघाटन

राम भोस्तेकर/माणगाव

रायगड जिल्ह्यात कोव्हिड उप जिल्हा रुग्णालय माणगांव येथे शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी २०८ लिटर ऑक्सीजनची क्षमता असणारी अद्यावत आधुनिक मिनी बल्क् कंटेनर सिस्टीम पफ इन्सूलेटेड माॅडिफाईड (mini bulk container system puf insulated modified ) प्रकारची यंत्रणा शासकिय अनुदानातून महाराष्ट्रात सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.
 जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. सुहास माने, कोव्हिड उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डाॅ. प्रदीप इंगोले यांचे मार्गदर्शना खाली हे काम जिव्हीएस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती ( GVS Air services pvt ltd. Baramati ) या शासन नियुक्त निविदा धारका मार्फत करण्यात आले आहे. या उदघाटन प्रसंगी जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. सुहास माने, नगराध्यक्षा योगिताताई चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेट यादव, राष्ट्रवादीचे सुभाष केकाने, नगरसेवक संदीप खरंगटे, जयंत बोडेरे, वैद्यकिय अधिकारी डाॅक्टर तूषार शेट, वरिष्ठ पोलीस निरिक्षक रामदास इंगवले आदि मान्यवर उपस्थित होते.
 शासनाकडून ड्युरा सिलिंडर टँक बसविण्यात आल्याने ऑक्सिजनची चांगली सुविधा उपलब्ध झाली असून ऑक्सिजन रिफीलींगची कपॅसिटी वाढली असून दररोजची ऑक्सिजन सिलिंडर रिफिलींगची मोठ्या क्लिष्ट प्रक्रीयेतून मुक्तता मिळाली आहे. त्यामुळे यापुढे ऑक्सिजनचा पूरेसा साठा उपलब्ध राहणार आहे. तसेच त्यावर योग्य नियंत्रण ठेवता येणार आहे. अशा प्रकारची मुंबई येथिल जे. जे. रुग्णालया प्रमाणे मोठ्या कपॅसिटीचे क्रायोटँकची मागणी आपल्या इथे शासना कडून उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहीती कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डाॅ. प्रदिप इंगोले यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा